

RSS News : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहकार्यवाहक आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी संघटन मंत्री मदनदास देवी (वय ८१) यांचे आज (सोमवारी) पहाटे बंगळुरू येथे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर उद्या (मंगळवारी) सकाळी अकरा पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत. जवळपास 70 वर्षे त्यांनी संघाच्या प्रचारासाठी काम केले. संघापासून ते भाजपपर्यंत राजकीय निरीक्षक म्हणूनही ते कार्यरत होते.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ते घरीच उपचार घेत होते. वर्षभरापूर्वी त्यांच्यावर हरिद्वारच्या पालमपूरच्या आयुर्वेद संस्थेत पंचकर्म व इतर उपचारही करण्यात आले होते. आज पहाटे बंगळुरू येथे निधन झाले.
बालपणापासूनच मदनदास देवींनी आपले आयुष्य राष्ट्रसेवा आणि संघकार्यात घालवले. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, मुरलीधर मोहोळ आदींनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली आहे.
"मदनदासजींचे कार्य, त्यांची मूल्ये माझ्यासारख्या करोडो कार्यकर्त्यांना नेहमीच प्रेरणा देत राहतील. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो," अशा शब्दात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
Edited By : Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.