Mahadev Jankar : म्हणायचं होतं भाबडा, पण म्हणाले...'; बारामतीत अजितदादांबाबत जानकर हे काय बोलून गेले?

Baramati Lok Sabha Constituency : बारामती लोकसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांच्या नेत्यांनी पायाला भिंगरी बांधल्याचे दिसून येत आहे.
Mahadev Jankar, Ajit PAwar
Mahadev Jankar, Ajit PAwarSarkarnama

Baramati Political News : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळीने चांगलाच वेग घेतला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील नेते एकमेकांवर जुनी उणीदुणी काढत आरोप - प्रत्यारोप करतना दिसत आहेत. हे करताना काही नेते भावनेच्या भरात असे बोलून जातात की त्याची चर्चा थांबता थांबत नाही.

बारामतीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी आलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे RSP अध्यक्ष महादेव जानकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची तोंडभरून कौतुक केले. मात्र याचवेळी त्यांच्याकडून एका शब्दाची गफलतही झाली. बोलण्याच्या ओघात अजितदादा भाबडा माणूस म्हणण्याऐवजी ते भामटा माणूस आहे, असे जानकर बोलून गेले.

राज्यात लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीला चांगलाच वेग आला आहे. या टप्प्यातील मतदान 7 मे रोजी होणार आहे. यात बहुचर्चीत बारामती लोकसभा Baramati मतदारसंघाचाही समावेश आहे. येथून महायुतीच्या सुनेत्रा पवार आणि महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे अशी नणंद-भावजय हायव्होल्टेज लढत होत आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी पायाला भिंगरी बांधल्याचे दिसून येत आहे.

Mahadev Jankar, Ajit PAwar
Lok Sabha Election 2024 : ओवेसी संभाजीनगरात येणार; जलिलांच्या विजयासाठी जंग जंग पछाडणार!

बारामतीतील धनगर समाज आपल्याकडे खेचण्यासाठी अजित पवारांनी महादेव जानकरांना Mahadev Jankar आपल्या कोट्यातली परभणीची सीट देऊ केली. आता परभणीचे मतदान पार पडले आहे. त्यामुळे महादेव जानकर आता महायुतीच्या इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यात ठिकठिकाणी जात आहेत. ते सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ बारामती लोकसभा मतदारसंघात आले होते. त्यावेळी अजितदादांबाबत बोलताना जानकरांकडून शब्द वापरण्यात गफलत झाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जानकर म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी माझ्यावर प्रेम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तर पंधरा दिवसांतच माझ्या प्रचारासाठी परभणीत आले. त्यासाठी त्यांनी थोडीसुद्धा चर्चा केली नाही. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, की सुनेत्रा पवारांचा विजय झाला पाहिजे. अजितदादा हा मनमोकळा माणूस आहे. भाबडा माणूस आहे, असे जानकर म्हणाले. यावेळी जानकरांची 'टंग स्लीप' झाली आणि भाबडा म्हणण्याऐवजी ते भामटा म्हणून गेले.

Mahadev Jankar, Ajit PAwar
Ambedkar Nagar Tour : प्रकाश आंबेडकरांनी उडवली भाजपच्या ‘चारशे पार’ची खिल्ली!

दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी बोलताना जपून बोलत जा, असा सल्ला खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar वारंवार आपल्या पदाधिकाऱ्यांना देतात. ध चा म झाल्यावर काय परिणाम होतो, याची जाणीव त्यांनी बारामतीतील शिर्सुफळ येथील सभेत करून दिली होती. धरणावर बोलल्यानंतर मीही कानाला खडा लावला आहे. भाषण करताना तोलून मापून शब्द वापरतो. आधी विचार करतो, नंतरच बोलतो, असेही दादांनी स्पष्ट केले होते.

(Edited by Sunil Dhumal)

Mahadev Jankar, Ajit PAwar
Latur Loksabha Constituency : राम मंदिर, ट्रिपल तलाक, कलम 370चा साक्षीदार होता आले, याचा आनंद..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com