Raj Thackeray : '...तर माझं अस्वल होईल', राज ठाकरेंना कशाची भीती?

Raj Thackeray Maharashtra Assembly Election MNS : उद्धव ठाकरेंचे सरकार आलं तेव्हा आम्ही मशि‍दीवरचे भोंगे उतरवण्यासाठी आंदोलन केलं. आमच्या 17 हजार महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांवर केस केल्या.
Raj Thackeray
Raj Thackeraysarkarnama
Published on
Updated on

Raj Thackeray News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पुण्याती कसबा मतदारसंघामध्ये जाहीर सभा घेतली. या सभेत बोलताना केलेल्या आंदोलनांची माहिती देताना राज ठाकरे म्हणाले, माझ्यावर 100 ते सव्वाशे केस झाल्या आहेत. त्यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणा दिली.

राज ठाकरे कार्यकर्त्याला उद्देशून म्हणाले, 'पुढच्या वेळी कळवतो त्यावेळी नक्की या. बाहेरगावी गेलो होतो असं म्हणून नका. मी अंगावर घतोय केसवर केस. आमचं होतंय अस्वल. हे मात्र रिकामे.'

राज ठाकरे म्हणाले, मराठी पाट्या होत नव्हत्या. मात्र, मनसे आंदोलन केले. तुमच्यासाठी कोणत्या राजकीय पक्षाने आंदोलन केले नाही. 2019 ला निकला लागला. शिवसेना भाजपला संपूर्ण बहूमत होतं. मात्र, अजित पवार गेले. पण ते लग्न अर्ध्या तासात मोडले कारण काकाने डोळे वटारले. ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यांच्यासोबत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस जाऊन बसली. त्यांच्या गळात हार घातला.

Raj Thackeray
Devendra Fadnavis: मराठवाड्यात 'जरांगे फॅक्टर'चा फटका रोखण्यासाठी फडणवीसांची मोठी खेळी? 'या' मराठा नेत्याची घेतली भेट

कसब्याशी खास कनेक्शन

राज ठाकरे म्हणाले, माझ्यासाठी कसब्याचे महत्त्व आहे. मी ज्यावेळी शिवसेनेतून बाहेर पडलो त्यावेळी पहिला महाराष्ट्र दौरा सुरू केला. पाहिला नको आपल्या मागे किती लोक आहेत. मला पक्षाची स्थापना करायची होती. पण त्याच्या आधी मी कसबा गणपतीला आलो पूजा करत पक्षाची स्थापना केली.

17 हजार मनसे सैनिकांवर केस

उद्धव ठाकरेंचे सरकार आलं तेव्हा आम्ही मशि‍दीवरचे भोंगे उतरवण्यासाठी आंदोलन केलं. आमच्या 17 हजार महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांवर केस केल्या. उद्धव ठाकरेंचे सरकार होतं. माझ्या 17 हजार महाराष्ट्र सैनिकांवर केस टाकल्या. माझ्यावर केस टाकल्या. उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत गेले आणि बाळासाहेब ठाकरेंच्या होर्डिंगवरचे हिंद

माझ्या मुलांवर केस टाकतो मुख्यमंत्री झाल्यानंतर तेव्हाची बाळासाहेबांची होर्डिंग काढून बघा त्यामध्ये बाळासाहेबांच्या नावा पुढचे हिंदुहृदयसम्राट काढून टाकले. का काढले तर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसला आवडणार नाही म्हणून काढले, असे राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray
Sadabhau Khot : आमदार सदाभाऊ खोतांचा गंभीर आरोप; म्हणाले, 'माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com