Pune News : जुन्या वाड्यांना झोपडपट्टी दाखवून अधिकाऱ्यांचा कोट्यवधींचा घोटाळा? अधिवेशनात गाजले प्रकरण

Assembly Winter Session Nagpur Sunil Tingre Pmc Scam Allegations : पुण्यात जुन्या वाड्यांचा मोठा प्रश्न आहे. आता या वाड्यांवरून मोठा घोटाळा झाल्याचा आरोप आमदाराने केला आहे...
PMC
PMC Sarkarnama

Maharashtra Assembly Winter Session 2023 : पुणे महापालिकेच्या हद्दीत असलेल्या जुन्या वाड्यांना झोपडपट्टी दाखवून घेण्यात आलेल्या टीडीआरची चौकशी करावी. तसेच बिल्डरच्या हितासाठी महापालिकेतील ज्या अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीने टीडीआरचे प्रस्ताव मंजूर केले आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आमदार सुनील टिंगरे यांनी केली.

PMC
Pune News : गुड न्यूज! देशातील सर्वात मोठा काचेचा स्कायवॉक; प्रकल्पाचा मार्ग मोकळा, राज्य सरकारचा मोठा निर्णय

नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार टिंगरे यांनी सभागृहात 'पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन' मध्ये पुणे शहरात जुन्या वाड्यांना झोपडपट्टी दाखवून काही खासगी बांधकाम व्यवसायिकांनी टीडीआर घेतल्याचे सांगितले. महापालिकेच्या अशा अधिकाऱ्यांकडून चुकीच्या पद्धतीने टीडीआर देण्यात आला आहे. बांधकाम व्यवसायिकांचा फायदा होण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांकडून अशा पद्धतीने टीडीआरचे प्रस्ताव मान्य करण्यात आल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. याची सविस्तर चौकशी करून चुकीच्या पद्धतीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सभागृहात आमदार सुनील टिंगरे यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुणे महापालिकेत असलेले जुने वाडे जे विकसित झालेले नाहीत, अशा वाड्यांना झोपडपट्टी पुनर्विकास योजना (एसआरए) दाखवून त्यांचा टीडीआर देण्यात आल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. बांधकाम व्यावसायिकाने पालिकेतील अधिकारी तसेच एसआरएमधील अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे टीडीआरचे प्रस्ताव मान्य करून घेतले आहेत.

टीडीआरचा उघडकीस आलेला हा प्रकार एक प्रकारचा मोठा घोटाळा आहे. याची चौकशी करण्याची मागणी आमदार टिंगरे यांनी केली आहे. शहरात अशा पद्धतीने 70 झोपडपट्ट्यांना पालिकेच्या वतीने सकारात्मक अभिप्राय देण्यात आला. यात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप सभागृहात करण्यात आला. विधानसभेच्या सभागृहात यावर आवाज उठविण्यात आल्याने आगामी काळात यामधील काही काळेबेरे समोर येण्याची शक्यता आहे.

PMC
Ashwini Jagtap : हिंजवडी आयटी पार्कचा धोका टळला, पुनावळेतील कचरा डेपोचा डाव आमदार अश्विनी जगतापांनी हाणून पाडला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com