Maharashtra Assembly Interim Budget : अर्थसंकल्पीय अधिवेशनातून काय मिळाले पुण्याला? पाहा यादी...

Maharashtra Budget 2024 : या अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुण्यासाठी काय मिळाले ? वाचा सविस्तर यादी... या तरतुदींमुळे होणार पुण्याचा विकास
Maharashtra Assembly Interim Budget : अर्थसंकल्पीय अधिवेशनातून काय मिळाले पुण्याला? पाहा यादी...
Published on
Updated on

Maharashtra Budget 2024  : महायुती सरकारच्या नेतृत्वाखाली सरकारने आज राज्याचा 2024-2025 चा एकूण खर्चासाठी 6 लाख 522 कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आज अर्थसंकल्प सादर केला आहे. 2024-2025 या वर्षासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आल्या असून, सध्या सुरू असलेल्या उपक्रमांसाठीही तरतुदी करण्यात आल्या आहेत.

अर्थमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री यांनी पुण्यातील महत्त्वाच्या प्रकल्पासाठीही घोषणा आणि तरतूदी आहेत. या अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे पुणे शहर आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Maharashtra Assembly Interim Budget : अर्थसंकल्पीय अधिवेशनातून काय मिळाले पुण्याला? पाहा यादी...
Maharashtra Budget 2024 : अजितदादांची खेळाडूंसाठी मोठी घोषणा; सुवर्णपदक विजेत्याला आता एक कोटीचे बक्षीस

अर्थसंकल्पातील महत्वाच्या घोषणा:

  • नाशिक-पुणे रेल्वे मार्गाचं भूसंपादन प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

  • पुणे-लोणावळा रेल्वे मार्गांकरिता 50 टक्के आर्थिक सहभाग

  • महात्मा ज्योतिबा फुले वाडा व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले स्मारकासाठी पुणे शहराच्या विकास योजनेत क्षेत्र आरक्षित करण्यात आले असून स्मारकाचा आराखडा तयार करण्याचे काम सध्या सुरु आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

  • पुणे चक्राकार वळण मार्गाकरिता 10,519 कोटी रूपयाची भूसंपादनासाठी तरतूद करण्यात आली आहे.

  • नागपूर एम्सच्या धर्तीवर औंध, पुणे येथे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था 

  • एकविरा देवी संस्थान येथे तीर्थक्षेत्र आणि परिसर विकासासाठी विशेष विकास प्राधिकरण स्थापन करण्यात येणार आहे.

  • राजगुरुनगर येथील हुतात्मा शिवराम हरि राजगुरु जन्मस्थळ परिसर विकासासाठी 102 कोटी 48 लाख रुपयाची तरतुद करण्यात आली आहे.

  • पुणे महानगरपालिकेमार्फत संगमवाडी येथे लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

  • राजगडच्या पायथ्याशी असलेल्या मौजे पाणखुर्द तालुका वेल्हे येथील राजमाता सईबाई यांच्या स्मृतिस्थळास 29 कोटी 73 लाख रुपये कामांना मंजुरी देण्यात आला आहे.

  • मौजे वडज, तालुका जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवनेरी संग्रहालय 

  • लोणावळा इथं जागतिक दर्जाचा स्कायवॉक प्रकल्प 333 कोटी 56 लाख किंमत

दरम्यान, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात कार्यक्रम खर्चाकरिता नियोजन विभागास 9 हजार 193 कोटी रुपये, रोजगार हमी योजनेसाठी 2 हजार 205 कोटी रुपये, मराठी विभागासाठी 71 कोटी रुपये नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे.

Maharashtra Assembly Interim Budget : अर्थसंकल्पीय अधिवेशनातून काय मिळाले पुण्याला? पाहा यादी...
Maharashtra Assembly Interim Budget Session 2024 LIVE : जब गरजती है नारीशक्ती, तो..! अजितदादांचा शायराना अंदाज अन् महिलांसाठी मोठी घोषणा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com