Maharashtra Assembly Interim Budget Session 2024 LIVE : जब गरजती है नारीशक्ती, तो..! अजितदादांचा शायराना अंदाज अन् महिलांसाठी मोठी घोषणा

Maharashtra assembly Interim Budget session 2024 LIVE updates in Marathi : अजित पवारांनी आज विधानसभेत राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला.
Finance Minister Ajit Pawar
Finance Minister Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar News : अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प (Maharashtra Assembly Interim Budget Session) सादर केला. यावेळी महिला सक्षमीकरणासाठी योजना आणि तरतुदींची माहिती देताना अजित पवारांनी शायरी करत महिला सबलीकरणाचा नारा दिला. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील आमदारांनीही अजितदादांच्या या खास शैलीला दाद दिली. अजित पवारांकडून महिलांसाठी पिंक रिक्षा योजनेचीही यावेळी घोषणा करण्यात आली.

अजित पवारांनी (Ajit Pawar) 2024-25 वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता महिला व बाल विकास विभागाला 3 हजार 107 कोटी रुपये प्रस्तावित केले आहेत. मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ ही योजना 1 एप्रिल 2023 पासून सुरू करण्यात आली आहे. लाभार्थी मुलीला या योजनेतून तिच्या वयाच्या 18 वर्षापर्यंत टप्प्याटप्याने एकूण 1 लाख 1 हजार रुपये मिळतील, अशी तरतूद करण्यात आली आहे.

Finance Minister Ajit Pawar
Maharashtra Budget 2024: सत्ताधाऱ्यांनी केवळ स्वत:ची पाठ थोपटून घेतली : उद्धव ठाकरे

लेक लाडकी योजनेची माहिती दिल्यानंतर अजित पवारांनी सभागृहात शेरो शायरी केली. महिलांची ताकद (Woman Empowerment) त्यांनी या शायरीतून सांगितली. ‘बिजली चमकती है तो आकाश बदल देती है, आँधी उठती तो दिनरात बदल देती है… जब गरजती है नाराशक्ती, तो इतिहास बदल देती है,’ या शायरीतून पवारांनी नारीशक्तीचा गौरव केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महिलांसाठी पिंक रिक्षा...

महिला सक्षमीकरणावर बोलताना अजित पवार म्हणाले, महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात किमान एक लाख महिलांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे. दहा मोठ्या शहरांतील किमान पाच हजार महिलांना पिंक रिक्षा उपलब्ध करून देण्याची योजना प्रस्तावित असल्याची घोषणा पवारांनी यावेळी केली.

शहरी भागातील कुपोषणाच्या समस्य़ेवर मात करण्यासाठी नागरी बाल विकास केंद्र सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची 14 हजार रिक्त पदे भरण्यात आली आहेत. उर्वरित पदे भरण्याची कार्यवाही सुरू आहे. 2014-25 वर्षात कार्यक्रम खर्चासाठी महिला व बाल विकास विभागाला 3 हजार 107 कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत, असे पवारांनी सांगितले.

Finance Minister Ajit Pawar
Maharashtra Interim Budget 2024 : अजित पवारांनी अर्थसंकल्पात केलेल्या 20 मोठ्या घोषणा कोणत्या ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com