Maharashtra Budget 2026: फडणवीसांनी अर्थसंकल्पात पुणेकरांना काय दिले?

Devendra Fadnavis Announcements for Pune District: पुण्याच्या विकासासाठी फडणवीसांनी अनेक प्रकल्पाना मंजुरी दिली तर काही सुरु असलेल्या प्रकल्पाचा विस्तार केला.
Devendra Fadnavis Announcements for Pune District
Devendra Fadnavis Announcements for Pune DistrictSarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis Announcements for Pune: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प मांडला. यात विविध योजना, प्रकल्पांची घोषणा केली. पुण्याच्या विकासासाठी फडणवीसांनी अनेक प्रकल्पाना मंजुरी दिली तर काही सुरु असलेल्या प्रकल्पांचा विस्तार केला. अर्थसंकल्पातून पुणेकरांना काय मिळाले जाणून घेऊया!

'नीरा-कऱ्हा' नदी जोड प्रकल्प

बारामती आणि पुरंदर तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला 'नीरा-कऱ्हा' नदी जोड प्रकल्प राबवण्याची घोषणा फडणवीसांनी अर्थसंकल्पात आहे. यामुळे या परिसरातील पाण्याचा प्रश्न कायमचा सुटण्यास मदत होईल, अशी आशा येथील ग्रामस्थांना आहे.

  • पुणेकरांना वाहतुक कोंडीतून सोडवण्यासाठी, पुण्याचा विस्तार करण्यासाठी हजारो कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई आणि पुण्याला मिळून 50 अब्ज डॉलर्सचे जागतिक केंद्र बनवण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट या अर्थसंकल्पातून मांडण्यात आले.

  • पुणे जिल्ह्यातील पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारने 'विशेष प्राधिकरणाची' (Special Authority) स्थापना केली आहे. यामुळे जमिनीचे संपादन आणि प्रत्यक्ष कामाला वेग येणार आहे.

  • बारामतीमध्ये 'नाईट लँडिंग'ची सुविधा उपलब्ध करून दिल्याने विमानवाहतुकीला मोठी चालना मिळणार आहे

  • पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला अधिकृत मान्यता देण्यात आल्याची माहिती फडणवीसांनी दिली. यामध्ये 'खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी' या महत्त्वाच्या मार्गाचा समावेश आहे.

  • तळेगाव ते चाकण' या औद्योगिक पट्ट्यासाठी उन्नत (Elevated) मेट्रो मार्गालाही हिरवा कंदील मिळाला आहे.

  • रेल्वे प्रवाशांसाठी पुणे-लोणावळा तिसऱ्या रेल्वेमार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

  • रस्ते वाहतुकीसाठी 'शिरूर ते छत्रपती संभाजीनगर' या ग्रीनफिल्ड महामार्गाला मान्यता देऊन पुणे-मराठवाडा कनेक्टिव्हिटी अधिक सुलभ करण्यात आली आहे.

  • 'येरवडा ते कात्रज' आणि 'हिंजवडी ते सिंहगड रस्ता' या मार्गांच्या आराखड्याचे कामही प्रगतीपथावर आहे. लवकरच पूर्ण होणार आहे.

  • मुंबई-पुणे हायस्पीड ट्रेनमुळे उत्पन्नात मोठी वाढ होण्याची शक्यताही अर्थसंकल्पात वर्तवण्यात आली आहे.

  • महाराष्ट्रात 295 हून अधिक गेमिंग स्टुडिओ उभारण्याचे आणि 'AVGC' धोरणांतर्गत स्टार्टअपला प्रोत्साहन देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. यात पुण्याला सर्वाधिक पसंती मिळत आहे. चार लाख उच्च कुशल रोजगार निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. खंडाळा येथे जागतिक दर्जाच्या 'इनोव्हेटिव्ह केंद्रा'साठी 130 कोटींचा निधी राखून ठेवण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com