Sanjay Mandlik : मंडलिकांना एकटं पाडायला ब्रह्मदेव यावा लागेल... : मुश्रीफ-घाटगे एकत्र येताच संजय मंडलिक गरजले

Kolhapur Politics : कार्यकर्त्यांसाठी नव्हे तर सत्तेसाठी हे दोघे एकत्र आले आहेत. दोघांनीही कार्यकर्त्यांची फसवणूक केली आहे.
Sanjay Mandlik_Hasan Mushrif_Samarjeet Ghatge
Sanjay Mandlik_Hasan Mushrif_Samarjeet GhatgeSarkarnama
Published on
Updated on

Sanjay Mandlik : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार संजय मंडलिक यांचा महायुतीतून पराभव झाल्यानंतर त्यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि तात्कालीन भाजपचे नेते समरजीत घाटगे यांना पराभवाला कारणीभूत ठरवून आरोप केले होते. पण, महायुतीचा धर्म म्हणून खासदार संजय मंडलिक यांनी आपल्या मुलाला आरोप करण्यपासून रोखले होते. मात्र, आता खुद्द संजय मंडलिक यांनीच मुश्रीफ आणि घाटगेंवर आरोप करत लोकसभेला आपल्या पराभवासाठी हे दोघेच कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे.

Sanjay Mandlik_Hasan Mushrif_Samarjeet Ghatge
Maharashtra Election: कार्यकर्ते गेले उडत! स्थानिक नेत्यांकडून अधिकारांचा गैरवापर; आमदार, खासदार, मंत्र्यांच्या घरातच उमेदवारीची खैरात; वाचा संपूर्ण यादी

कागल नगरपालिका निवडणुकांमध्ये हसन मुश्रीफ आणि त्यांचे कट्टर राजकीय विरोधक समरजीत घाटगे एकत्र आल्यानंतर, माजी खासदार संजय मंडलिक यांनी या युतीवर टीका केली आहे. कार्यकर्त्यांसाठी नव्हे तर सत्तेसाठी हे दोघे एकत्र आले आहेत. दोघांनीही कार्यकर्त्यांची फसवणूक केली आहे. यापूर्वी जे निर्णय झालेत ते कार्यकर्त्यांना विचारत घेऊन निर्णय झालेत. आता कार्यकर्त्यांना समजावून काय उपयोग? इंग्रजांनी जो 'सॉरी' शब्द काढला तो लाथ मारून झाल्यावर म्हणतात. त्यामुळं आता जनतेला दोघांनी लाथ मारली आहे, मग सॉरी म्हणत आहेत. अशी टीका माजी खासदार संजय मंडलिक यांनी केली.

Sanjay Mandlik_Hasan Mushrif_Samarjeet Ghatge
Kalyan Dombivli News: अनमोल म्हात्रेंच्या प्रवेशानंतर काही तासातच तीन नगरसेवकही भाजपमध्ये; माजी नगरसेविकेची घरवापसी

लोकसभा निवडणुकीतील संदर्भ पाहता हे दोघेही नेते माझ्यासोबत प्रामाणिक नव्हते. त्यांनी प्रचार केला पण प्रामाणिक केला नव्हता. कारण समरजीत घाटगे यांचे चुलते प्रवीणराजे घाटगे हे खासदार शाहू महाराज छत्रपती यांचे प्रचार प्रमुख होते. मुश्रीफ पालकमंत्री असताना देखील ते प्रचारात म्हणत होते की, एक लाखापेक्षा अधिक मताधिक्य देणार. मात्र, 14 हजारांचे मताधिक्य केवळ मिळाले, हे दोघे एकत्र असताना इतकं मताधिक्य हे कमीच आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मुश्रीफ सोबत नसताना मला 75,000 मताधिक्य होतं. पण आता मंडलिक यांना एकट पाडायला ब्रह्मदेव यावा लागेल.

Sanjay Mandlik_Hasan Mushrif_Samarjeet Ghatge
Election Commission SIR : मतदारयाद्यांच्या कामासाठी प्रेशर, दोन BLO च्या आत्महत्येने खळबळ, निवडणूक आयोग अडचणीत?

ज्या ठिकाणी असे नेते एकत्र आले आहेत त्याला स्थानिकच राजकारण कारणीभूत आहे याला महायुती जबाबदार नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील महायुती ही भक्कमच आहे. नगरपालिका निवडणुका सोबत जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुका देखील आम्ही जिंकू. कोल्हापूर महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेवर भगवा झेंडा फडकवणे हेच आमचं ध्येय असल्याचं माजी खासदार मंडलिक यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com