Sharad Pawar : मतदान केंद्रावरच शरद पवारांचा अजितदादांवर पलटवार; चार वेळा उपमुख्यमंत्रीपद देऊनही कसला अन्याय झाला ?

Baramati Assembly Constituency election 2024: आजची निवडणूक महाराष्ट्रातील शेतकरी, युवक, महिलांसाठी व महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्वाची असल्याचं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. ते मतदानासाठी गोविंद बागेतून माळेगावमध्ये आले होते.
Sharad Pawar | Yugendra Pawar | Ajit Pawar
Sharad Pawar | Yugendra Pawar | Ajit Pawarsarkarnama
Published on
Updated on

माळेगाव (पुणे) : विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरवात झाली आहे. बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथील मतदान केंद्रावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सकाळी नऊ वाजता कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.

"महाराष्ट्राच्या सत्तेत अनेकदा आणि राज्याचे उपमुख्यमंत्रीपद चार वेळा देऊनही अजित पवारांवर अन्याय झाला असे म्हणणे कितपत योग्य आहे," अशा शब्दात शरद पवार यांनी अजितदादांची कानउघाडणी केली.

अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सांगता सभेत अजित पवार यांच्यावर अन्याय झाला, अशा पद्धतीचा खुलासा केला होता, त्यामुळे त्या मुद्द्याला अनुसरून शरद पवार बोलत होते. शरद पवार यांनी भारतीय जनता पार्टीच्या कुटील राजनीतीचा सातत्याने उल्लेख करीत महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा लागल्याचे स्पष्टपणे बोलून दाखवले.

Sharad Pawar | Yugendra Pawar | Ajit Pawar
Maharashtra Voting Today 20 November 2024 : EVM बंद ; मालेगाव, नागपूर, नाशिक, कोथरुड, जामनेरमध्ये मतदारांचा खोळंबा

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेला हल्ला, खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराचा आरोपावर शरद पवार यांनी भाष्य केले. ते म्हणाले, सुप्रिया सुळे यांच्यावर ज्या व्यक्तीने आरोप केले तो व्यक्ती कसा आहे याची चौकशी करावी. त्याला अधिकचे काही महत्त्व देण्याची आवश्यकता नाही. माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेला हल्ला हा दुर्दैवी प्रकार आहे. यावरूनच भारतीय जनता पार्टीची विचाराची पात्रता दिसून येते.

Sharad Pawar | Yugendra Pawar | Ajit Pawar
Why Dry Days : मतदान अन् मतमोजणीच्या दिवशी Dry Day का असतो? निवडणूक आयोगानं सांगितली कारणं

आजची निवडणूक महाराष्ट्रातील शेतकरी, युवक, महिलांसाठी व महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्वाची असल्याचं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. ते मतदानासाठी गोविंद बागेतून माळेगावमध्ये आले होते. यावेळी त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्याआधी त्यांनी आजची निवडणूक अत्यंत महत्वाची असल्याचा संदेश मतदारांना दिला.

विनोद तावडे यांच्यावर झालेल्या गुन्ह्याची माहिती मला नाही माहिती घेऊन बोलणे आवश्यकता आहे , असे पवार यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडी उत्तम पद्धतीने यशस्वी होईल, अशा पद्धतीची भूमिका शरद पवार यांनी मांडली, यावेळी प्रतिभा पवार, खासदार सुप्रिया सुळे, सदानंद सुळे, रेवती सुळे यांनी मतदानाचा हक्क बजावला.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com