Baramati News : बारामतीतील 'त्या' अधिकाऱ्याला सरकारचा दिलासा, पण धाडले थेट हजार किमी दूर...

Avadhut Jadhavar reinstated : एका खासगी पॅरामेडिकल संस्थेच्या अध्यक्षांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे जाधवर यांच्याविरोधात तक्रार केली होती.
ACB Trap
ACB TrapSarkarnama
Published on
Updated on

Anantrao Pawar ITI update : बारामती तालुक्यातील माळेगाव येथील अनंतराव पवार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे निलंबित तत्कालीन उपप्राचार्य व प्राचार्य (अतिरिक्त कार्यभार) अवधुत जाधवर यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. जाधवर यांना मागील वर्षी ४० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते.

बारामतीतील एका नामांकित हॉटेलजवळ ही कारवाई झाली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे २५ जूनला जाधवर यांना निलंबित करण्यात आले होते. तर सप्टेंबर महिन्यांत त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली होती. निलंबित आढावा समितीने १४ जानेवारीला झालेल्या बैठकीत अवधुत जाधवर यांच्याबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे.

समितीने जाधवर यांना सेवेत पुन:स्थापित करण्याची शिफारस केली आहे. ही शिफारस सरकारनेही मान्य केली आहे. त्यानुसार त्यांचे त्यांच्याविरोधातील फौजदारी खटल्यातील निर्णयाच्या व विभागीय चौकशीच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून निलंबन संपुष्टात आणून शासन सेवेत पुन:स्थापित करण्यात येत आहे, असा जीआर सरकारने काढला आहे.     

ACB Trap
Modi Government : टॉवेल, अंतवस्त्रे, तेल आणण्यासाठीही सरकारी टीम, अधिकाऱ्याचा शाही दौरा वादात; शिंदे संतापले, कारवाई सुरू...

जाधवर यांना पुन्हा शासन सेवेत घेताना सरकारने त्यांना थेट गडचिरोलीला धाडले आहे. तेथील क्रांतिवीर बाबुराव शेडमाके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (आदिवासी) उपप्राचार्य पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने हा शासन निर्णय जारी केला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

एका खासगी पॅरामेडिकल संस्थेच्या अध्यक्षांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे जाधवर यांच्याविरोधात तक्रार केली होती. संस्थेतील परीक्षांसाठी शासकीय पर्यवेक्षकसाठी तक्रारदाराने आयटीआयकडे विनंती केली होती. जाधवर यांनी या नेमणुकीसाठी प्रतिविद्यार्थी दोन हजार रुपये याप्रमाणे ९० हजार रुपयांची मागणी केली होती.

ACB Trap
Supreme Court News : सुप्रीम कोर्ट सरकारची पिसं काढणार; न्यायपालिका हादरविणारी बाब समोर, सरन्यायाधीशांचा संताप...

याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केल्यानंतर जाधवर यांना ४० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. बारामतीतील या कारवाई शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली होती. जाधवर हे आठ महिने निलंबित होते. आता त्यांना पुन्हा खटल्यातील निर्णय व विभागीय चौकशीच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून सेवेत घेण्यात आले आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com