IPS Officer Transfer : IPS मनोज पाटील पुन्हा पुण्यात आले; आता अ‍ॅडिशनल CP झाले !

Maharashtra IPS Officers Transfer : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 44 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.
IPS Manoj Patil
IPS Manoj Patil Sarkarnama
Published on
Updated on

Pune News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 44 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारच्या गृह विभागाने लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी हा आदेश काढला. मुंबई शहर पोलिस उपायुक्त मनोज पाटील यांची पुणे शहरात पदोन्नतीवर बदली झाली आहे. अप्पर पोलिस आयुक्त म्हणून त्यांची बदली झाली आहे. (Maharashtra IPS Officers Transfer)

मनोज पाटील हे एमपीएससी परीक्षा देत पोलीस उपअधीक्षक म्हणून 1998 मध्ये निवड झाली. तत्पूर्वी ते संगणकशास्त्रात अभियांत्रिकी पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी काही काळ सांगलीच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून देखील काम केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

IPS Manoj Patil
Pankaj Deshmukh : पुणे ग्रामीण पोलिसांत आता 'देशमुखी थाट'! पंकज देशमुख नवे एसपी

पोलिस उपअधीक्षक पदावर काम केल्यानंतर पदोन्नतीवर मनोज पाटील हे 2010 मध्ये आयपीएस झाले. त्यांनी दौंड येथे राज्य राखीव पोलिस दलाचे समादेशक म्हणून आणि ठाणे शहरात उपायुक्त म्हणून काम केले. तसेच जळगाव, कोल्हापूर, सातारा, कऱ्हाड, भिवंडी, पुणे, ठाणे, सोलापूर ग्रामीण येथून नगरमध्ये पोलिस अधीक्षक पदावर आले.

त्यानंतर त्यांची सोलापूर (ग्रामीण) येथे पोलिस अधीक्षक म्हणून नेमणूक झाली. नगरमध्ये मनोज पाटील यांनी पोलिस दलातील शिस्त, ई-टपाल कार्यप्रणाली हे उपक्रम गाजले. यानंतर मनोज पाटील यांची मुंबई येथे पोलिस उपायुक्त पदावर बदली झाली.

मनोज पाटील हे ठाणे शहरात पोलिस उपायुक्त पदावर कार्यरत होते. यानंतर ते सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक असताना, गुणवत्तापूर्व सेवेसाठी पोलिस पदकाने तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते. सोलापूर ग्रामीणमध्ये गुन्हेगारांविरोधात त्यांनी टू-प्लस योजना यशस्वीपणे राबवली.

यानंतर नगर बदली होऊन आल्यानंतर येथे देखील त्यांनी ही योजना यशस्वी केली. कोविड काळात मनोज पाटील यांनी नगरमध्ये नियोजनपूर्वक काम केले. यातून त्यांनी नगरच्या पोलिस दलात आदर्शवत पोलिस अधीक्षक म्हणून कामाचा ठसा उमटला.

मनोज पाटील हे आता पुन्हा एकदा पुण्यात पदोन्नतीवर बदलून आले आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बदल्या झाल्या आहेत. मनोज पाटील यांचा पोलिस दलातील प्रशासकीय अनुभवाचा कस या लोकसभा निवडणुकीत लागणार आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

IPS Manoj Patil
Maratha Reservation Survey: मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी अधिकारी, कर्मचारी 'फिल्डवर'; महापालिकेत शुकशुकाट !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com