Pimpri Chinchwad Politics : आधी एकनाथ शिंदे आता अजितदादा? पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप मोठ्या भूकंपाच्या तयारीत

PCMC NCP leaders joining BJP : महायुतीमध्ये भाजपा-राष्ट्रवादीची युती बोलणी फिस्कटल्यानंतर भाजपला सर्व १२८ जागा स्वबळावर लढविता येणार असल्याने पक्षाने आक्रमक रणनीती आखली आहे. २०१७ च्या निवडणुकीत भाजपने ७७, तर राष्ट्रवादीने ३२ जागा जिंकल्या होत्या. आता शंभरी पार करण्यासाठी भाजपाला निवडून येण्याची खात्री असलेले तगडे चेहरे हवे आहेत.
Pimpri-Chinchwad Mahayuti Politics
A group of political leaders discussing strategies amid rising BJP influence in Pimpri-Chinchwad. The image highlights growing BJP entry buzz in local politics.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News, 20 Nov : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये सुरू असलेले प्रवेश सध्या चर्चेचा विषय बनत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अनेक नेते भाजपने आपल्याकडे घेतले आहेत.

यामुळे शिंदेच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. हीच नाराजी घेऊन एकनाथ शिंदे दिल्ली दरबारी गेल्याचं सांगितलं जात आहे. अशातच भाजपने पिंपरी चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का देण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा सुरू आहे.

आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत “शंभर पार” आणि “शत-प्रतिशत भाजपा” हा नारा घेऊन मैदानात उतरलेल्या भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) मोठा धक्का देण्याच्या तयारीला वेग दिला आहे. पक्षाच्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे वरिष्ठ पदाधिकारी आणि तब्बल दहाहून अधिक माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी संपर्कात असून, लवकरच त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडण्याची शक्यता आहे.

Pimpri-Chinchwad Mahayuti Politics
Maharashtra government decision : राज्य सरकारचा मोठा निर्णय : निवडणुकीच्या धामधुमीतच तालुका तक्रार निवारण समित्या बरखास्त

महायुतीमध्ये भाजपा-राष्ट्रवादीची युती बोलणी फिस्कटल्यानंतर भाजपला सर्व १२८ जागा स्वबळावर लढविता येणार असल्याने पक्षाने आक्रमक रणनीती आखली आहे. २०१७ च्या निवडणुकीत भाजपने ७७, तर राष्ट्रवादीने ३२ जागा जिंकल्या होत्या. आता ७७ चा आकडा ओलांडून शंभरी पार करण्यासाठी भाजपाला निवडून येण्याची खात्री असलेले तगडे चेहरे हवे आहेत. त्यासाठीच राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांना “ट्रॅप”मध्ये पकडण्याचा डाव आखला जात आहे.

भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी याबाबत खुलासा करताना म्हटले, “शत-प्रतिशत भाजपासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. भाजपाच्या निष्ठावंतांवर अन्याय होता कामा नये, पण शहराच्या विकासासाठी शंभरहून अधिक नगरसेवक निवडून आणायचे आहेत. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दहाहून अधिक माजी नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. त्यांना भाजपात यायची इच्छा आहे. याबाबत वरिष्ठ नेत्यांना कळवले असून, लवकरच निर्णय होईल.”

Pimpri-Chinchwad Mahayuti Politics
CJI Bhushan Gavai news : निवृत्तीआधी CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल; दोन न्यायमूर्तींचा राज्यपालांबाबतचा निकाल बदलताना इशाराही दिला...

चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार असल्याने तेथील राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक भाजपच्या संपर्कात आहेत. २०१७ मध्येच अनेक राष्ट्रवादी इच्छुकांनी पक्षांतर करून भाजपाच्या लाटेचा फायदा घेतला होता. तोच “पॅटर्न” आता पुन्हा राबवला जाण्याची दाट शक्यता आहे. हा पक्षप्रवेश झाल्यास महापालिकेच्या राजकारणात मोठी खळबळ उडणार असून, अजित पवारांना मोठा धक्का बसणार आहे. भाजपच्या या रणनीतीमुळे राष्ट्रवादीचं “पानिपत” होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com