Maharashtra Politics : अजितदादांकडून धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळातील 'कमबॅक'चे संकेत; सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं, आकामुळे...

Dhananjay Munde Controversy : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचं रमी प्रकरण बाहेर आल्यानंतर विरोधकांकडून सातत्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार काही कठोर निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
supriya sule, dhananjay munde, ajit pawar
Ajit Pawar defends Dhananjay Munde post-clean chit in the agriculture scam, hinting at his cabinet comeback amid Manikrao Kokate’s controversySarkarnama
Published on
Updated on

Pune News, 26 Jul : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचं रमी प्रकरण बाहेर आल्यानंतर विरोधकांकडून सातत्याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार काही कठोर निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अशातच आता माणिकराव कोकाटे यांचं कृषिमंत्री पद जाणार असून त्यांच्या जागी आमदार धनंजय मुंडे यांची पुन्हा एकदा मंत्रिमंडळात एन्ट्री होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. याच चर्चांवर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसत आहे. नुकतंच कृषी मंत्रालय धनंजय मुंडे यांच्याकडे असताना झालेल्या घोटाळ्याच्या आरोपां संदर्भात त्यांना क्लीन चीट मिळाली आहे.

या प्रकरणावर बोलताना अजित पवारांनी मुंडेंची पाठराखण केली आहे. तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत कोकाटे यांचे मंत्रीपद जाऊन त्या ठिकाणी धनंजय मुंडेंची एन्ट्री होऊ शकते अशी शक्यता वर्तवली आहे.

supriya sule, dhananjay munde, ajit pawar
RSS-Muslim Meet : "बाटग्या हिंदुत्ववाद्यांना..."; मोहन भागवतांची मुस्लीम धर्मगुरूंसोबत बैठक घेताच ठाकरेंच्या शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल

अशातच अजित पवार शुक्रवारी पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी कृषी विभागातील घोटाळ्यात तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांचा कोणताही संबंध नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केलं. यां सदर्भात अजितदादांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, कृषी विभागातील घोटाळ्याबाबत जे आरोप झाले त्यामध्ये धनंजय मुंडेंचा कुठेही सहभाग नाही असं न्यायालयाने सांगितला आहे.

मात्र, त्यांची बदनामी व्हायची ती झाली. याबाबत रखानेच्या राखणे बातम्या आल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाने देखील बातम्या दाखवल्या. त्यामुळे या प्रकरणांमध्ये त्यांना त्यांच्या परिवाराला जो मनस्ताप झाला तो परत येऊ शकत नाही. त्यांच्याबाबत आणखी एक प्रकरणांमध्ये चौकशी सुरू आहे. त्या चौकशांमधून सर्व सत्य समोर आणि त्यामध्ये त्यांचा जर दुरान्वय संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देऊ असं संकेत अजित पवारांनी दिलेत.

supriya sule, dhananjay munde, ajit pawar
Mahayuti Politics : शिंदेंच्या नेत्याला फडणवीसांनी डावललं, मंत्रिपद जाणार? नाराज शिरसाटांना माधुरी मिसाळांनी दिलेल्या 'त्या' उत्तरामुळे चर्चांना उधाण

अजित पवारांचं वक्तव्य आणि धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळात एन्ट्री यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली या हत्येच्या मागे वाल्मिक कराड होता. त्याचा आका नेमका कोण होता. हे सुरेश धसांनी अनेकदा सांगितलं आहे.

या आकामुळे अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहेत, असं असताना देखील क्लीन चिट कसली देता. लोकांची घर उध्वस्त होत आहेत आणि तुम्ही कसली क्लीन चीट देत फिरत आहात, अशा लोकांना आम्ही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात येऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका सुळे यांनी घेतल्याचं पाहायला मिळालं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com