
Pune News : तुकडाबंदी कायद्यामुळं राज्यात ५० लाख कुटुंबांची प्रचंड अडचण झाली असून त्यांना दिलासा देण्यासाठी तुकडा बंदी उठविण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. त्यांची अंमलबजावणी कशी करायची? याबाबत नियमावली (एसओपी) तयार करण्याचं काम सुरू आहे. येत्या १५ दिवसांत ती तयार करून राज्यात लागू करण्यात येईल, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली आहे.
त्याचबरोबर 'आधी मोजणी, मग दस्तनोंदणी आणि नंतर फेरफारची नोंद' अशी पद्धत राज्यात राबविणार आहे,” याला मान्यता देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना केली आहे, असंही यावेळी बावनकुळे यांनी सांगितली. कर्नाटक, आंध्र प्रदेशच्या धर्तीवर राज्यात जमाबंदी आयुक्तालयांच्या अखत्यारित १० ते १५ खासगी भूकरमापकांना याबाबत अधिकार देण्यात येणार आहे.
महसूल विभागाच्यावतीनं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राज्यस्तरीय सेवा पंधरवडा अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. यावेळी त्यांनी सात महिन्यांत महसूल खात्यानं राबविलेल्या विविध योजना आणि विकासकामांचा आढावा घेतला. महसूल लोकअदालत आणि पाणंद रस्ते खुले करण्याबाबत पुणे जिल्हा प्रशासनाचं त्यांनी कौतुक केलं.
नोंदणी मुद्रांक शुल्क विभागात आता पासपोर्ट विभागाच्या कार्यालयांसारखी राज्यात कार्यालये सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी सात गावांची ठिकाणे निश्चित केली आहेत. त्यातून विविध सोयी उपलब्ध होणार आहेत. मंत्रालय स्तरावर त्याची 'वॉर रूम तयार केली आहे. 'वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन' बरोबरच आता 'वन स्टेट - वन रजिस्ट्रेशन' आणि फेसलेसद्वारे दस्तनोंदणीचा प्रयोग राबविणार आहे, अशी माहिती बावनकुळे यांनी यावेळी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.