Sharad Pawar : खासगी कारखान्यांना कामगारांची आस्था उरलेली नाही; साखर उद्योग संकटात येण्याची शरद पवारांनी व्यक्त केली भीती

Sharad Pawar on Sugar Cooperatives : माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी राज्यातील सहकारी साखर कारण्यांबाबत चिंता व्यक्त करत हे कारखाने खासगी कारखान्यांच्या स्पर्धेमध्ये टिकणार नसून खासगी कारखान्यांना कामगारांची आस्था राहिलेली नसल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
Sharad Pawar
Sharad Pawarsarkarnama
Published on
Updated on

Pune News, 17 Aug : माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी राज्यातील सहकारी साखर कारण्यांबाबत चिंता व्यक्त करत हे कारखाने खासगी कारखान्यांच्या स्पर्धेमध्ये टिकणार नसून खासगी कारखान्यांना कामगारांची आस्था राहिलेली नसल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

ते साथी किशोर जन्मशताब्दीनिमित्त आयोजित 'साखर उद्योग व कामगार चळवळ अनुभव व दृष्टी' या विषयावर ते बोलत होते. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, साखर उत्पादनात देशात पहिल्या क्रमांकावर उत्तर प्रदेश आहे. मात्र, महाराष्ट्रात दिवसेंदिवस सहकारी चळवळीला सुरुंग लागण्यास सुरुवात झाली आहे.

खासगी कारखान्यांना कामगारांची आस्था राहिलेली नाही, अशी खंत पवारांनी व्यक्त केली. तर एकेकाळी खासगी कारखाने महाराष्ट्रातील लोकांचे होते. मात्र, आता तसे चित्र दिसत नाही. राज्यातील खासगी कारखाने राज्याबाहेरच्या लोकांचे असल्यामुळे त्यांना स्थानिकांशी आस्था नसल्याचंही ते म्हणाले.

शिवाय खासगी कारखान्यांची गाळपक्षमता मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यामुळे कमी क्षमतेचे सहकारी कारखाने टिकणे अवघड झाले आहे. खासगी साखर कारखान्यांनी कामगारांची संख्यादेखील कमी केल्यामुळे सहकारी कारखाने त्यांच्या स्पर्धेमध्ये टिकणार नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने गाळप क्षमतेबाबत विचार करणे गरजेचं आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar : 'होय वसंतदादांचं सरकार मीच पाडलं..., पण का?' पहिल्यांदाच जाहीर कबुली देत शरद पवारांनी सांगितलं 70 च्या दशकातील राजकारण

त्यासाठी राज्य सहकारी साखर कारखाना संघ, राज्य सरकार यांच्यात चर्चा घडवून याबाबत धोरण ठरविण्याची गरज असल्याचं मतं पवारांनी यावेळी व्यक्त केलं. दरम्यान, यावेळी किशोर पवार यांच्या कामाचा उल्लेख करताना ते म्हणाले की, पूर्वी साखर कामगार संघटना चर्चेसाठी आल्यानंतर कामगारांच्या पदरात जास्तीतजास्त पाडून घेण्याची त्यांची भूमिका पवार यांची असायची.

Sharad Pawar
Dilip Walse Patil News : आम्हाला चिंता होती; मात्र विलासराव म्हणाले, दिलीपराव तुमचे महाविद्यालय मंजूर: वळसे पाटलांनी सांगितला किस्सा

मात्र, बैठकीनंतर कारखानदार संघटनेचे नेत्यांमध्ये सख्य असायचं. त्यांनी कायमच शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला, असं शरद पवारांनी सांगितलं. या कार्यक्रमाला माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, साथी किशोर पवार प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. किरण ठाकूर, राज्य साखर कामगार प्रतिनिधी संघाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, प्रतिष्ठानच्या सचिव वंदना पवार, उपाध्यक्ष अंकुश काकडे इत्यादी नेते उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com