राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे चित्र आहे. शिंदे-फडणीस सरकारमध्येनंतर सहभागी झालेल्या अजित पवार यांची राष्ट्रवादी 39 जागांवर आघाडीवर आहे. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी राष्ट्रवादीच्या या यशाबाबत अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येत असतानाच अजित पवारांनी एक्सवर एक फोटो पोस्ट केला आहे. महाराष्ट्रानं गुलाबी रंगाला निवडलं, असं कॅप्शन दिलं आहे. गुलाबी कॅम्पेन आणि अजित पवारांच्या निवडणुकीचं कॅम्पेन हाताळणाऱ्या अरोरांचा सत्काराचा फोटो त्यांनी पोस्ट केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारांनी राजकारणात आपली वेगळी 'चूल' मांडली. पण त्यांना लोकसभा निवडणुकीत फटका बसला, अपेक्षित यश मिळाले नाही.
अजित पवार यांनी आपल्या जनसन्मान यात्रेत परिधान केलेल्या गुलाबी जॅकेटची चर्चा सर्वत्र झाली. अजितदादांनीही जवळपास डझनभर गुलाबी रंगाची जॅकेट्स शिवून घेतले होते, अशी माहिती होती.
नेहमीच पांढरा झब्बा अन पायजम्यात दिसणारे अजित पवार यांनी पक्षाच्या प्रचारासाठी स्वतंत्र कंपनी नेमली. त्यानंतर त्यांच्या या गुलाबी गुलाबी जॅकेटची विरोधकांनी टिंगल उडवली, आता विधानसभा निवडणुकीत अजितदादांच्या राष्ट्रवादीला यश मिळत आहे. काँग्रेसच्या उमेदवार आदिती तटकरे यांची विजयाच्या दिशेने घौडदौड सुरु आहे.
राजकीय रणनीतीकाराच्या सल्ल्यानंतर अजित पवार यांच्या पक्षाची ओळख गुलाबी रंग ठसविण्याचा प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहे. अजितदादांच्या जनसन्मान यात्रेत गुलाबी गाडी आणि बस सुद्धा पाहायला मिळल्या होत्या. विधानसभा मतदारसंघात प्रचारातही अजितदादांचे गुलाबी जॅकेट लक्षवेधून घेत होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.