Rajendra Shingne: अजितदादांबरोबर नाईलाजाने गेलो...,आजही मी शरद पवारांना नेता मानतो' म्हणणारा माजी मंत्री 'तुतारी' फुंकणार?

Former Minister join Sharad Pawar NCP: भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यानंतर आता विदर्भातील माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे.
Sharad Pawar, Ajit Pawar
Sharad Pawar, Ajit Pawarsarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर अनेक मोठ्या नेत्यांचे पक्षप्रवेश होत आहेत. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात पक्षप्रवेशाच्या जोरदार हालचाली सुरु आहेत. पक्षप्रवेशासाठी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aaghadi) शरद पवारांचा (Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडीवर आहे.

काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातील नेत्यांकडून एकमेकांचे आमदार संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे. यातील काही दावे आता खरे ठरत आहेत.

काही दिवसांपूर्वी भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी प्रवेश केला होता. त्यानंतर आता विदर्भातील माजी मंत्री, आमदार आमदार राजेंद्र शिंगणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होणार असल्याचे निश्चित झाल्याची माहिती आहे. राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingne) हे सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.

Sharad Pawar, Ajit Pawar
Hiraman Khoskar: अजितदादांचा शब्द खरा ठरला! क्रॉस व्होटिंगचा आरोप असलेला काँग्रेसचा आमदार राष्ट्रवादीच्या गळाला

काही दिवसापूर्वी राजेंद्र शिंगणे यांनी “मी अजित पवार यांच्याबरोबर नाईलाजाने गेलो”, असे सांगत त्यांनी शरद पवार यांचे कौतुक केले होते. तेव्हापासून शिंगणे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशा चर्चा सुरु होत्या. आजही मी शरद पवारांना नेता मानतो, असे ते म्हणाले होते. आता ते आपल्या नेत्यासोबत जाणार आहेत.

Sharad Pawar, Ajit Pawar
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राज्यात काही तासांतच लागणार आचारसंहिता; निवडणुकीचे बिगुल वाजणार

शरद पवार गटाकडून ते विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. राजेंद्र शिंगणे सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आज दुपारी आहे. महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीच बिगुल आज वाजणार आहे. आजपासून दोन्ही राज्यात आचारसंहिता लागू होईल. महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षांचे जागा वाटप सुरु आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com