Mahavikas Aghadi News : विरोधकांची कसब्यातली एकी महापालिकेत 'भाजप'चे गणित बिघडवू शकते?

Kasba by Election News : पुण्यातल्या कोणकोणत्या प्रभागात बसू शकतो फटका?
Mahavikas Aghadi News : Shivsena : NCP : Congress
Mahavikas Aghadi News : Shivsena : NCP : Congress Sarkarnama

Pune Pmc : काँग्रेस, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) एकजूट दाखवून कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीत विजय खेचून आणला. तिन्ही पक्षांच्या एकजुटीच्या लढतीने भाजपचा बालेकिल्ला ढासळू शकतो, हे प्रत्यक्षात दाखवता आला. आता ही आघाडी आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकीत कायम राहणार क नाही, यावर पुणे महापालिकेचं गणित ठरणार आहे. ही आघाडी कायम राहिली तर भाजपच्या ९९ नगरसेवकांपैकी तब्बल ५७ जण धोक्यात येऊ शकतात, असे आकडेवारीवरून स्पष्ट दिसत आहे.

कसबा विधानसभेत मागील तीन दशकांपासून भाजपचा सलग सहा वेळा विजय झाला. भाजपसाठी हा मतदारसंघ नेहमीच सुरक्षित असल्याचे मानले जात होते. २०१९ मध्ये सरकार मध्ये आलेले महाविकास आघाडी सरकार कोसळ्यानंतर आता शिवसेना आणि भाजपचे शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. महाविकास आघाडीचा हा कसब्यात पहिलाच प्रयोग आहे. यामुळे याकडे सर्वांच लक्ष लागले होते. महाविकास आघाडीने एकत्रित येऊन निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मतांची फाटाफूट न होता भाजपचा ११ हजार मतांनी पराभव झाला.

Mahavikas Aghadi News : Shivsena : NCP : Congress
Old Pension News: ‘ती’ राज्ये पाच ते सात वर्ष जुनी पेन्शन देतील, पुढे काय..?

२०१७ च्या महापालिका निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. यामध्ये १६२ पैकी ९९ नगरसेवक भाजपचे निवडून गेले. या नगरसेवकांची मुदत मार्च २०२२ मध्ये संपली आहे. गेल्या एका वर्षापासून प्रशासकाच्या माध्यमातून काम सुरू आहे. आगामी महापालिका निवडणुका कधी होणार हे स्पष्ट झालेले नसले तरी कसब्याच्या पोटनिवडणुकीतील पराभव भाजपचे डोळे उघडणारा ठरणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीत सत्ता हवी असेल तर किमान ८७ पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येणे आवश्‍यक आहे. त्यामुळे भाजपकडून यापूर्वी११० नगरसेवक निवडून आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

Mahavikas Aghadi News : Shivsena : NCP : Congress
Satara News: मोदी हटाव संसार बचाव... गॅस दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसची निदर्शने

असा बसू शकतो फटका :

महापालिका निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाने आघाडी कायम ठेवली तर त्याचा थेट फटका भाजपला बसू शकतो. चारचा प्रभाग झाला तर त्यांचे ९९ पैकी ५७ नगरसेवक धोक्यात येऊ शकतात. तर ४२ नगरसेवकांना या आघाडीचा कोणताही फरक पडणार नाही., तेथे भाजपची ताकद जास्त असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. मात्र, आघाडीतील कुरबुरी, जागा वाटपातील वाद, त्यातून होणारी बंडखोरी, स्थानिक समीकरणे, नातीगोती, उमेदवाराची प्रतिमा हे मुद्देही लक्षात घेऊन काही प्रभागात भाजपला दिलासाही मिळू शकतो. पण २०१७ च्या महापालिका निवडणुकीच्या निकालातील आकडेवारीवरून कोणत्या कोणत्या प्रभागात फटका बसू शकते हे स्पष्ट होत आहे.

महाविकास आघाडी झाली तर धोक्यात आलेले भाजपचे प्रभाग क्रमांक (अडचणीत असलेल्या नगसेवकांची संख्या) प्रभाग क्रमांक १ धानोरी कळस (३), प्रभाग क्रमांक ३ विमाननगर सोमनाथनगर (४), प्रभाग क्रमांक ५ वडगावशेरी कल्याणीनगर (३), प्रभाग क्रमांक पुणे विद्यापीठ वाकडेवाडी ७ (४), प्रभाग क्रमांक ८ औंध बोपोडी (४), प्रभाग क्रमांक ९ बाणेर बालेवाडी (२), प्रभाग क्रमांक १० बावधन खु. कोथरूड डेपो (२), प्रभाग क्रमांक ११ रामबाग कॉलनी शिवतीर्थ नगर ( १), प्रभाग क्रमांक १४ डेक्कन जिमखाना (४), प्रभाग क्रमांक १६ कसबा सोमवार पेठ (१), प्रभाग क्रमांक १७ रस्ता पेठ रविवार पेठ (१), प्रभाग क्रमांक १८ खडकमाळ आळी महात्मा फुले पेठ (३), प्रभाग क्रमांक १९ लोहियानगर कासेवाडी (१), प्रभाग क्रमांक २१ कोरेगाव पार्क घोरपडी (१), प्रभाग क्रमांक २३ हडपसर गावठाण सातववाडी (२), प्रभाग क्रमांक २५ वानवडी (२), प्रभाग क्रमांक २६ महंमदवाडी कौसरबाग (१), प्रभाग क्रमांक २९ नवी पेठ पर्वती (२), प्रभाग क्रमांक ३० जनता वसाहत दत्तवाडी (३), प्रभाग क्रमांक ३१ कर्वेनगर (३), प्रभाग क्रमांक ३३ वडगाव धायरी (१),प्रभाग क्रमांक ३५ सहकार नगर पद्मावती (१), प्रभाग क्रमांक ३६ मार्केटयार्ड लोअर इंदिरानगर (१), प्रभाग क्रमांक ३७ अप्पर सुपर इंदिरानगर (१), प्रभाग क्रमांक ३८ बालाजीनगर राजीव गांधी नगर (२), प्रभाग क्रमांक ३९ आंबेगाव दत्तनगर कात्रज गावठाण (१), प्रभाग क्रमांक ४१ कोंढवा बु. येवलेवाडी (३).

या भागात दिलासा :

नागपूरचाळ फुलेनगर, बावधन कोथरूड डेपो, डहाणूकर कॉलनी, एरंडवणा,शनिवार पेठ, सदाशिव पेठ, सॅलिसबरी पार्क, सिंहगड रस्ता, मार्केटयार्ड, इंदिरानगर या भागातील भाजपला बऱ्यापैकी दिलासा मिळू शकतो. तेथे महाविकास आघाडीचा प्रभाव कमी असल्याचे २०१७ च्या आकडेवारीवरून समोर आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com