Pune By Poll Election : चिंचवडमध्ये महाविकास आघाडीच्या विजयाला बंडखोर उमेदवारामुळे 'कलाट'णी

Rahul Kalate : राष्ट्रवादीचे नाना काटे दुसऱ्या तर अपक्ष राहुल कलाटे तिसऱ्या क्रमांकावर
Ashwini Jagtap, Nana Kate, Rahul Kalate
Ashwini Jagtap, Nana Kate, Rahul KalateSarkarnama
Published on
Updated on

Chinchwad By Election Result : कसबा आणि चिंचवडमध्ये पोटनिवडणूक लागताच भाजप आणि महाविकास आघाडीकडून अनेकांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. कसब्यात काँग्रेसने रवींद्र धंगेकरांना उमेदवारी देताच बाळासाहेब दाभेकारांनी बंडखोरी केली. त्यांचे बंड शांत करण्यास काँग्रेसला यश आले.

चिंचवडमध्येही राष्ट्रवादीने नाना काटे (Nana Kate) यांना उमेदवारी दिली. त्यानंतर तेथे प्रबळ दावेदार समजत असलेले राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी बंडखोरी केली. त्यांना शांत करण्यासाठी अजित पवार, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रयत्न केले. मात्र त्यांनी उमेदवारी अर्ज भरला. या बंडखोरीचा फटका महाविकास आघाडीला बसल्याचे आता दिसून येत आहे.

Chinchwad चिंचवडमध्ये मी कसा योग्य उमेदवार आहे, यासाठी राहुल कलाटे यांनी अनेक कारणे दिली. कलाटे म्हणाले होते की, "जनता माझ्यामागे आहे. २०१९ निवडणुकीत भाजपचे लक्ष्मण जगताप यांच्याविरोधात जनतेने मला एक लाख १२ हजार मते दिली होती. त्यामुळे जनतेचा कौल मला आहे. जनतेने टाकलेला विश्वास सार्थ करण्याची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे मी भरलेला उमेदवारी अर्ज माघार नाही," अशी भूमिका कलाटे यांनी घेतली होती.

Ashwini Jagtap, Nana Kate, Rahul Kalate
Nilam Gorhe News : हक्कभंगावर तुर्तास निर्णय नाही, संजय राऊत सात दिवसात खुलासा करणार..

अजित पवार (Ajit Pawar) यांनी कलाटे यांना समजावून सांगण्याचा अनेकदा प्रयत्न केला. वेळप्रसंगी त्यांनी कलाटे यांना खडे बोल सुनावले होते. २०१९ मध्ये राष्ट्रवादीला उमेदवारी मिळाली होती. मात्र राष्ट्रवादीने उमेदवार न देता अपक्ष कलाटे यांना आघाडीने पाठिंबा दिला. त्यामुळे कलाटे यांना एक लाख १२ हजार मते मिळाली होती. हे त्यांच्या लक्षात येत नाही. बघू आता त्यांना किती मते मिळतात, असेही पवार जाहीर सभेत बोलले होते.

आता कसब्याचा निकाल आला आहे. तेथे बंडखोरी टळल्यामुळे थेट भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत झाली होती. त्यात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) ११ हजार ४० मतांनी विजयी झाले आहेत. चिंचवडमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी झाल्याने तिरंगी लढत झाली. येथे आता भाजपच्या अश्विनी जगताप सर्व फेऱ्यांतून आघाडीवर आहेत. नाना काटे दुसऱ्या क्रमांवर तर अपक्ष राहुल कलाटे (Rahul Kalate) तिसऱ्या क्रमांवर आहेत.

Ashwini Jagtap, Nana Kate, Rahul Kalate
Ravindra Dhangekar : भाजपच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडणाऱ्या धंगेकरांचं टिळक कुटुंबियांनी केलं अभिनंदन!

चिंचवडमध्ये २२ फेऱ्यानंतर जगताप यांना ७४१७४ मते, काटे यांना ६१८०४ मते तर कलाटे यांना २५८८४ मते मिळालेली आहेत. यातून महाविकास आघाडीत झालेल्या बंडखोरीमुळे भाजपला फायदा झाल्याचे दिसून येत आहे. सध्या मिळालेली काटे आणि कलाटे यांची मते एकत्र केली तर ८७ हजार ६८८ होतात. हा आकडा भाजपच्या उमेद्वारापेक्षा १३ हजार ५१४ इतका जास्त आहे. या स्थितीमुळे चिंचवडमध्ये अपक्ष राहुल कलाटे यांच्यामुळे निकालाला कलाटणी मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

याबाबत अजित पवार यांनीही राहुल कलाटे यांची कानउघडणी केली आहे. पवार म्हणाले, "कलाटे २०१९ मध्ये मिळालेल्या एक लाख १२ हजार मतांच्या जोरावर बेडकासारखे फुगले होते. त्यांना वारंवार सांगितले की ती मते फक्त तुमची नसून आघाडीचीही आहेत. मात्र त्यांनी ऐकले नाही. त्यांना जनतेचा कौल पहायचा होता. आता त्यांना समजले असेल त्यांची खरी मते किती आहेत ते."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com