Mahesh Landge News : आमदार महेश लांडगेंच्या विजयासाठी महायुतीची ‘‘वज्रमूठ’’

Mahesh Landge and Bhosari Assembly Constituency : परिसरातील ज्येष्ठांनी केला निवडणुकीत विजयाचा संकल्प; महायुतीच्या मोशी निवडणूक कचेरीचे दिमाखात उद्घाटन
Mahesh Landge
Mahesh Landgesarkarnama
Published on
Updated on

BJP Mahesh Landge and Bhosari Vidhan sabha Election : भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी- आरपीआय व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार महेश लांडगे यांची निवडणूक कचेरी मोशीत सुरू करण्यात आली आहे. मोशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेजवळील या कचेरीचे ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मोशीचे ग्रामदैवत नागेश्वर महाराजांच्या जयघोषात कचेरीचे कामकाज सुरू झाले.

माजी महापौर नितीन काळजे, माजी महापौर राहुल जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा कविता आल्हाट, माजी नगरसेविका सारिका बो-हाडे, माजी उपमहापौर शरद बो-हाडे, निखिल बो-हाडे, निलेश बोराटे, वंदना आल्हाट, सागर हिंगणे, राजेश सस्ते, गणेश सस्ते, मंगेश हिंगणे, काळूराम सस्ते, नामदेव सस्ते, रवि गायकवाड, प्रवीण बनकर, मनिषा सस्ते, राष्ट्रवादीचे विजय सस्ते, मधुकर बोराटे, संजय हजारे यांच्यासह मोशी परिसरातील नागरिक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. मोठ्या उत्साहात कचेरीचे उद्घाटन करण्यात आले.

Mahesh Landge
Mahesh Landge : दिघी रोड परिसरातील नागरिकांनी दिला विजयाच्या ‘हॅट्रिक’चा विश्वास!

मागील १० वर्षांत केलेल्या विकास कामाच्या जोरावर आमदार महेश लांडगे(Mahesh Landge) तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. २०१७ मध्ये महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर खऱ्या अर्थाने आमदार लांडगे यांच्या माध्यमातून समाविष्ट गावातील विकास कामांना चालना मिळाली. समाविष्ट गावातील नितीन काळजे, राहुल जाधव यांना महापौरदाच्या माध्यमातून शहराचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली.

२०१७ पासून समाविष्ट भागाचा झपाट्याने विकास झाला. सर्व सोयी-सुविधा नागरिकांना उपलब्ध झाल्या. त्यामुळे समाविष्ट भागातील नागरिक आमदार महेश लांडगे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. आमदार लांडगे यांच्या प्रचार फेरी, कोपरा सभांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

Mahesh Landge
Jitendra Awhad: 'जितेंद्रभाऊ तुमच्या मेंदूला काय लकवा मारलाय का?' ; राष्ट्रवादी काँग्रेसचा आव्हाडांवर पलटवार!

'समाविष्ट गावांचा विकास हाच माझा राजकीय अजेंडा राहीला आहे. २०१७ मध्ये महानगरपालिका भाजपा(BJP) सत्ता काळात समाविष्ट गावांच्या विकासाला चालना मिळाली. त्यामुळे चिखली-मोशी-चऱ्होली रेसिडेन्सिअल कॉरिडॉर विकसित झाला. बोऱ्हाडेवाडी येथे रहिवाशी क्षेत्र वगळून टीपी स्कीम राबवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला. त्यामुळे सर्वसमावेशक विकासाचे ध्येय दृष्टीक्षेपात आले आहे.' असं भाजपचे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांनी सांगितलं आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com