Jitendra Awhad: 'जितेंद्रभाऊ तुमच्या मेंदूला काय लकवा मारलाय का?' ; राष्ट्रवादी काँग्रेसचा आव्हाडांवर पलटवार!

Rupali Thombre Criticized Jitendra Awhad : अजित पवारांच्या राष्ट्रवादी कडून आव्हाडांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर; जाणून घ्या, रूपाला ठोंबरे आणखी काय म्हणाल्या आहेत?
Rupali Thombre | Jitendra Awhad
Rupali Thombre | Jitendra AwhadSarkarnama
Published on
Updated on

Pune News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आणि त्यांच्या पक्षावर टीका केली आहे. मुंब्रा कळवा येथील जाहीर सभेमध्ये बोलताना अजित पवार यांचा गट पाकीटमारांची टोळी असल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले होते. त्यानंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून यावर तीव्र प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी आव्हाड यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

रुपाली ठोंबरे म्हणाल्या, 'जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी नुकतंच आम्हाला आणि आमच्या नेत्याला पाकीटमार म्हटलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी की त्यांनी मर्द वैगरे असे काही शब्द काढले आहेत. तर मला वाटतं जितेंद्रभाऊ तुमच्या मेंदूला काय लकवा मारलाय का? आपण काय शब्दांचा उपयोग करत आहात.'

'निवडणुकीच्या काळात मान्य आहे की तुमच्याकडे विकासाची कोणतीही कामे सांगायला नाहीत. म्हणून सातत्याने जे स्वत: महापाकीटमार आहेत. होय, जितेंद्र आव्हाड तुम्ही महापाकीटमार, चोर आहात. कारण, ज्यांना कावीळ झालेला असतो, त्यांना सगळं जग पिवळं दिसतं. त्यामुळे सातत्याने ज्यांसोबत ज्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम केलं, त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला म्हणून तुम्ही त्यांच्यासाठी असे शब्द वापरणार असाल, तर खरंच तुमच्या मेंदूवर लकवा मारलेला आहे.'

Rupali Thombre | Jitendra Awhad
Mahayuti News : महायुतीच्या नेत्यांची धाकधूक वाढली; बंडखोर उमेदवार नाॅट रिचेबल

तसेच, 'सगळ्यात प्रथम या निवडणुकीत तुम्ही जनतेसमोर जाताना, तुमच्या मतदारसंघात तुम्ही एखादं विकासाचं काम केलेलं सांगा. तर आम्ही तुम्हाला मानू. अन्यथा ही जी काही तुमची केविलवाणी धडपड सुरू आहे. या राष्ट्रवादी काँग्रेसमधील सगळ्यात मोठे घरभेदी आहात तुम्ही.' असं रुपाली ठोंबरे यांनी म्हटलं आहे.

Rupali Thombre | Jitendra Awhad
Praniti Shinde's Regret : काँग्रेसमधील काहींनी अजूनही माझे नेतृत्व स्वीकारले नाही; सुशीलकुमार शिंदेंच्या नेतृत्वाच्या आवाहनावर प्रणितींची खंत

याशिवाय, 'त्यामुळे तुम्ही आमच्या नेत्याबाबत शब्द उच्चारताना, वापरताना जपून वापरावे. त्यांच्या पक्षातील इतर लोकांना माझी विनंती आहे, कृपया जितेंद्र आव्हाडांवर तातडीने आपण उपचार करावेत. अन्यथा आम्हाला कायदेशीर सुद्धा उपचार यांच्यावर करावे लागतील. जशाच तसे उत्तर त्यांना द्यायला तर आम्ही तयारच आहोत, परंतु लोकप्रतिनिधी असूनही निवडणुकीच्या कालावधीत महाराष्ट्राच्या राजकारणाचा दर्जा जेवढा खाली आणताय, तेवढा आव्हाड तुम्ही आणत आहात. तो आणू नये.

शब्दप्रयोग करताना जरा जपून आणि संवेदनशीलपणे आणि कायदेशीररित्या वापरले गेले पाहिजेत. तुम्ही स्वत: पाकिटमार आहात हे लक्षात ठेवा, कारण तुम्हालाच जग पिवळं दिसतय.' अशा शब्दांमध्ये रूपाली ठोंबरे यांनी आव्हाडांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com