Pune Police News: वाढत्या गुन्हेगारीवर 'मोक्का'चा उतारा : महिन्याला तीन 'मोक्का'; पण तरीही कमी होईना गुन्ह्यांचा टक्का

Pimpri-Chinchwad and Pune Police CommissionerNews: गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गुन्हेगारांवर `मोक्का` लावण्याचा धडाका सुरु
Police Commissioner Ritesh Kumar and Police Commissioner Vinay Kumar Choubey
Police Commissioner Ritesh Kumar and Police Commissioner Vinay Kumar Choubey Sarkarnama
Published on
Updated on

Crime News: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात गुन्हेगारीने मोठे डोके वर काढले असून मावळात, तर खूनसत्रांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विनयकुमार चौबे हे पोलीस आयुक्त म्हणून आल्यानंतर उद्योगनगरीत यावर्षात आतापर्यंत गुन्हेगारीचा आलेख हा चढताच आहे. त्यामुळे त्यावर उतारा म्हणून गुंड टोळ्यांना `मोक्का` लावण्याचा सपाटा त्यांनी सुरु केला असला, तरी गुन्हेगारी काही कमी होण्याचे नावच घेत नाही.

पुण्याचे पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गुंड टोळ्यांना `मोक्का` लावण्याचा धडाका सुरु केला आहे. तसा वेग आता पिंपरीच्या पोलीस आयुक्तांनीही या कारवाईला दिला आहे. गेल्या सहा दिवसांत त्यांनी आठ टोळ्यांतील ६२ गुन्हेगारांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) १९९९ नुसार कारवाई केली आहे.

Police Commissioner Ritesh Kumar and Police Commissioner Vinay Kumar Choubey
Mahesh Landge Akhad Party: भाजप आमदार महेश लांडगेंच्या पाच कोटींच्या आखाड पार्टीची 'ईडी' चौकशी करणार का? राष्ट्रवादीचा सवाल..

तळेगाव दाभाडे (ता.मावळ,जि.पुणे) नगरपरिषदेतील माजी सत्ताधारी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्येचा सूड म्हणून प्रतिस्पर्धी राजकीय पक्षाच्या मातब्बराचा खून करण्याचे कटकारस्थान केलेल्या व त्यासाठी मध्यप्रदेशातून मोठा शस्त्रसाठा आणलेल्या प्रमोद सोपान सांडभोर (वय ३३ रा.हरणेश्वरवाडी, तळेगावस्टेशन) व त्याच्या चार साथीदारांवर ६ तारखेला या मोक्का सत्रातील पहिली कारवाई तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात पोलिसांनी केली. त्यांच्याविरुद्ध २६ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

तर, दुसऱ्या दिवशी (ता.७) दहा गुन्हे नोंद असलेल्या बाबा सैफन शेख (वय २९,रा.पिंपळे गुरव) व त्याच्या आठ साथीदारांना सांगवी पोलिसांनी मोक्काचा दणका दिला. त्याच दिवशी चिखली पोलिसांनी २४ गुन्हे दाखल असलेल्या १२ जणांच्या टोळीचा म्होरक्या करन रतन रोकडे (वय २५,रा.चिखली) याला हा हिसका दाखवला.

त्यानंतर दोनच दिवसांनी (ता.९) पिंपरी पोलिसांनी २१ गुन्हे दाखल अतुल ऊर्फ चांड्या अविनाश पवार (वय ३०,रा.मिलिंदनगर,पिंपरी) व त्याच्या १५ साथीदारांना मोक्का लावला. तर, आज आणखी दोन टोळ्यांविरुद्ध पोलिसांनी ही कारवाई केली.

Police Commissioner Ritesh Kumar and Police Commissioner Vinay Kumar Choubey
Pradeep Kurulkar News : कुरुलकरांकडून दोन महिलांवर लैंगिक अत्याचार; ATS'च्या तपासात धक्कादायक माहिती उघड

तळेगाव दाभाडे येथील जय ऊर्फ किटक प्रवीण भालेराव (वय १९ रा.सिद्धार्थनगर,तळेगाव दाभाडे) टोळीला मोक्कान्वये स्थानबद्ध केले. त्याच्या टोळीत पाचजण असून त्यांच्याविरुद्ध १३ गुन्हे नोंद आहेत. आजची दुसरी मोक्काची कारवाई रावेत पोलिसांनी केली. त्यांनी रामा परशुराम पाटील (वय २९,रा.थेरगाव) आणि त्याच्या दोन साथीदारांना मोक्काचा प्रसाद दिला. त्यांच्याविरोधात नऊ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

चौबे यांनी गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये १२ तारखेला पिंपरी-चिंचवडमध्ये ,तर त्यानंतर दोन दिवसांनी (ता.१६) रितेशकुमार यांनी पुण्यात पोलिस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.आतापर्यंत पिंपरी-चिंचवडमध्ये १८ गुंडटोळ्या व त्यांच्या १९६ गुंडाविरुद्ध मोक्काचा बडगा उगारण्यात आला आहे.तर,पुण्यात याच कालावधीत म्हणजे गेल्या सहा महिन्यांत ३४ मोक्काच्या कारवाया केल्या आहेत. म्हणजे पिंपरी-चिंचवडमध्ये महिन्याला तीन, तर पुण्यात महिन्याला जवळजवळ सहा मोकाच्या केसेस होत आहेत.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com