Pradeep Kurulkar News : कुरुलकरांकडून दोन महिलांवर लैंगिक अत्याचार; ATS'च्या तपासात धक्कादायक माहिती उघड

ATS News Update : देशाच्या संरक्षणासंबंधीची गोपनीय माहिती दिल्याच्या आरोपाखाली कुरुलकर यांना दोन महिन्यापूर्वी अटक करण्यात आली
Pradeep Kurulkar Case Update
Pradeep Kurulkar Case UpdateSarkarnama
Published on
Updated on

DRDO Pradeep Kurulkar News: संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (DRDO) संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्याबाबत दिवसेंदिवस धक्कादायक माहित्या समोर येत आहेत. यातून त्यांच्या अडचणीही वाढण्याची शक्यता आहे.

प्रदीप कुरूलकर यांनी दोन महिलांवर डीआरडीओच्या कार्यालयात अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. एटीएसने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात या संदर्भात उल्लेख केला आहे.

Pradeep Kurulkar Case Update
Bawankule vs Thackeray : ...म्हणूनच, आई-वडिलांची अन् पोहरादेवीची शपथ घ्यावी लागते !

डीआरडीओच्या (DRDO) कामाचे टेंडर देतो, असे सांगून कुरुलकर यांनी दोन महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढले. या महिलांना कार्यालयात बोलवून त्यांच्यावर अत्याचार केले, अशी धक्कादायक माहिती 'एसटीएस'ने आपल्या आरोपपत्रात दिली आहे.या प्रकरणाचीही तपास सुरू असल्याचं एटीएस'ने आपल्या आरोपपत्रात म्हटलं आहे.

पाकिस्तानी (Pakistan) गुप्तहेरांच्या जाळ्यात अडकून देशाच्या संरक्षणासंबंधीची गोपनीय माहिती दिल्याच्या आरोपाखाली कुरुलकर यांना दोन महिन्यापूर्वी अटक करण्यात आली. त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली त्यांना २१ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.या प्रकरणात कुरुलकर यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने आरोपपत्र दाखल केलं आहे.

Pradeep Kurulkar Case Update
Ramdas Athawale : शरद पवार, उद्धव ठाकरे यांनीही भाजप सरकारमध्ये यावे!

एटीएस'ने केलेल्या दोन महिन्यांच्या चौकशीत कुरुलकर यांच्याविरोधात भक्कम पुरावा जमा करण्यात आले. तपास पथकाने त्याच्या विरोधात पुणे जिल्हा न्यायालयात सुमारे दोन हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. झाराने प्रदीपशी मैत्री केली आणि ब्रह्मोस लाँचर, अग्नी मिसाईल लॉन्चर आणि मिलिटरी बिडिंग सिस्टम, ड्रोन, यूसीव्ही आणि इतर गोष्टींची माहिती काढून घेतली. त्यानंतर प्रदीपने ही सर्व माहिती गोळा करून पाकिस्तानी एजंटला पाठवली. कुरूलकरने व्हॉट्सअप चॅट आणि तीन ई-मेलच्या माध्यमातून कुरुलकरने पाकिस्तानी हसीनाला संवेदनशील माहिती दिली. dreamgirl56@gmail.com। या नावाने पाकिस्तानी गुप्तहेर झारा दासगुप्ता करुलकरशी संवाद साधायची.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com