Manchar Nagar Panchayat Result
Manchar Nagar Panchayat ResultSarkarnama

Malegaon Nagar Panchayat Result: अजितदादांच्या होमटाऊनमध्ये पाच अपक्षांची दमदार एन्ट्री : क्रॉस व्होटिंगने बिघडवलं गणित

Ajit Pawar Malegaon politics: माळेगावात नगराध्यक्षपदासह १८ उमेदवार निवडून येण्यासाठी राष्ट्रवादी व जनमत विकास आघाडीचे कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांनी 'पॅनेल टू पॅनेल' मतदान करून घेण्यासाठी मेहनत घेतली होती.
Published on

माळेगाव (पुणे): राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे होमटाऊन असलेल्या माळेगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुयोग सातपुते हे नगराध्यक्ष झाले आहेत. त्यांनी ११ हजार मतांनी विजय मिळवला आहे. बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रूक नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व जनमत विकास आघाडी युतीला मतदारांना कौल दिला आहे.

अजित पवार यांच्या नेतत्वाखालील या नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व जनमत विकास आघाडीने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. मात्र या निवडणूकीत पाच अपक्ष उमेदवारांनी आपला विजय खेचून आणला आणि आपली राजकीय ताकद दाखवून दिली.

१२ पैकी सुयोग सातपुते यांच्या नगराध्यक्षपदासह ९ जागांवरच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला विजय मिळविता आला आहे. जनमत विकास आघाडीला तीन जागा व प्रमोद तावरे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी-भाजप पुरस्कृत एक जागा जिंकता आली. त्या उलट माजी सरपंच दीपक तावरे यांच्या नेतृत्वाखाली पाच अपक्ष उमेदवारांनी आपला विजयी खेचून आणला. त्यांनी आपली राजकीय ताकद दाखवून दिली. या सर्व प्रक्रियत मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला एकही जागा मिळविता आली नाही. या पक्षाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार रुपेश भोसले सुमारे तीन हजार मतांपर्यंतच पोचू शकल्याचे सांगण्यात आले.


Manchar Nagar Panchayat Result
Manchar Nagar Panchayat Result : वळसे पाटील, आढळराव पाटलांचा गड आला पण सिंह गेला... एकनाथ शिंदेंच्या सभेने नगराध्यक्षपदाची गणित बदलली

माळेगाव निवडणूक अनुषंगाने १४ हजार ४५८ मतदान झाले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने माळेगावच्या निवडणूकीत पारंपारिक विरोधक रंजन तावरे यांच्या जनमत विकास आघाडीबरोबर संगनमत केले होते. त्यामध्ये राष्ट्रवादीला १२, तर जनमत आघाडीला ५ जागा असा फार्मुला घेऊन नेत्यांनी आपापले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले होते. याशिवाय या नेत्यांनी १ जागा भाजप पुरस्कृत विजयी झालेले प्रमोद तावरे यांना सोडली होती. अचानक पुढे आलेली पवार-तावरे युती विशेषतः राष्ट्रवादीच्या कार्य़कर्त्यांना आवडली नाही.

निवडणुकीतील वैशिष्ठ म्हणजे प्रभाग क्रमांक ९ मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवार अॅड.गायत्री राहूल तावरे व अपक्ष उमेदवार जयश्री बाळासाहेब तावरे यांना एकसमान प्रत्येकी ६१६ मते मिळाले. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी उज्वला सोरटे यांनी या प्रभागात चिठ्ठीपद्धत अवलंबत जयश्री तावरे यांना घोषित केले. त्यानुसार अपक्षांनी पाच जागांवर विजय मिळवत राजकारणात आपली नवी ओळख निर्माण केली.या यशामागे अपक्ष उमेदवारांचे गट नेते दीपक तावरे यांची रणनीती व संघटन कौशल्य महत्त्वाचे ठरल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते.

अपक्ष 5 उमेदवारांच्या अंगावर गुलाल टाकला.

माळेगावात नगराध्यक्षपदासह १८ उमेदवार निवडून येण्यासाठी राष्ट्रवादी व जनमत विकास आघाडीचे कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांनी 'पॅनेल टू पॅनेल' मतदान करून घेण्यासाठी मेहनत घेतली होती. त्याच पद्धतीने या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवार व कार्यकर्त्यांमध्ये एकजूट दिसून आली होती.परंतु माळेगावकरांनी 'क्रॉस व्होटिंग'चा दणका संबंधित पक्षांच्या मुख्य उमेदवारांना देत अपक्ष ५ उमेदवारांच्या अंगावर गुलाल टाकला.

अनेक प्रभागामध्ये मतदारांनी भावकी, बेट, मित्र परिवार आणि राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षावरील नाराजीचा सुर व्यक्त करीत 'क्रॉस व्होटिंग' केल्याचे मतमोजणीत स्पष्ट झाले. या प्रक्रियेत मात्र दोन माजी सरपंच जयदीप विलास तावरे व जयदीप दिलीप तावरे विजयी झाले. लक्षवेधी ठरलेल्या प्रभाग ११ मध्ये अविनाश भोसले यांना निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले.

माळेगावात राष्ट्रवादी व जनमत विकास आघाडीने स्पष्ट बहुमतासह सत्ता मिळाल्याने विकासाच्या मुद्द्यांवर काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. निकालानंतर समर्थकांनी जल्लोष करत विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. आगामी काळात उपमुख्यमंत्री अजित पवार, रंजन तावरे या नेत्यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीत स्थिर प्रशासन व विकासाभिमुख निर्णय घेईल, अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुयोग सातपुते यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com