Pune Politics: हॉटेल, ढाबे फुल्ल! पॉपलेट, चिकन-मटन बिर्याणीवर ताव, बंटी-बबली वाटताहेत मताला 5 हजार रुपये

Manchar Nagar Panchayat election 2025:नगराध्यक्ष पदासाठी एकूण सहा उमेदवार व १६ नगरसेवक पदासाठी ६७उमेदवार आहेत. उद्या (मंगळवारी) मतदान आहे. त्यामुळे आजची रात्र उमेदवारांसाठी महत्वाची आहे. तर काही ठिकाणी रात्री लक्ष्मी दर्शन होईल म्हणून मतदार लक्ष ठेवून आहेत.

Manchar Nagar Panchayat election 2025
Manchar Nagar Panchayat election 2025Sarkarnama
Published on
Updated on

मंचर: यंदा पहिल्यादाच मंचर नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक होत आहे. उमेदवारांमध्ये चुरस पराकाष्ठेला पोहोचली आहे. चढाओढीच्या स्पर्धेत मतदारांचा ‘भाव खूपच वाढला’ आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी उमेदवारांमधील स्पर्धा प्रचंड वाढल्याने पैशांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याची चर्चा आहे.

नगराध्यक्ष पदासाठी एकूण सहा उमेदवार व १६ नगरसेवक पदासाठी ६७उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उद्या (मंगळवारी) मतदान आहे. त्यामुळे आजची रात्र उमेदवारांसाठी महत्वाची आहे. तर काही ठिकाणी रात्री लक्ष्मी दर्शन होईल म्हणून मतदार लक्ष ठेवून आहेत.

मंचर परिसरातील हॉटेल, ढाबेही फुल्ल झाले आहेत. मांसाहारींसाठी मासे पॉपलेट, चिकन, मटन बिर्याणी ची व्यवस्था करण्यात आली आहे. हॉटेलपर्यंत न येणाऱ्यांसाठी घरपोच 'पार्सल' पाठवले जात असल्याचे एका हॉटेल मालकाने सांगितले. एकंदरीत निवडणूक रंगतदार होत आहे. मतदार राजा कोणावर प्रसन्न होणार हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल.


Manchar Nagar Panchayat election 2025
ZP Election 2025: नगरपरिषदेत मतांचा 'भाव' पाहून निवडणुकीपूर्वीच ZP इच्छुकांना 'घाम फुटला'

मंचर परिसरात मोठ्या प्रमाणात मतदारांना 'लक्ष्मी दर्शन'होत असून मताला तीन ते पाच हजार रुपयांपर्यंत बाजार भाव फुटल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.

येथे राष्ट्रवादी काँग्रेस भाजप युतीच्या उमेदवार मोनिका बाणखेले, शिवसेनेच्या उमेदवार राजश्री गांजाळे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युतीच्या उमेदवार रजनीगंधा बाणखेले, काँग्रेसच्या उमेदवार फर्जिन मुलाणी,अपक्ष उमेदावार प्राची थोरात, अपक्ष उमेदवार जागृती महाजन या उमेदवारांमध्ये लढत होत आहे.

स्लिप बरोबरच पैसे

'आम्हालाच मतदान करा,' अशी विनंती करून मतदारांना र्हॉटेल , पान टपऱ्या येथे निवडणूक स्लिप बरोबरच पैसे वाटप होत आहे. मतदारांनी यावेळी येत असलेल्या 'लक्ष्मी'ला स्वीकारले आहे. अनेक उमेदवारांकडून आर्थिक लाभ दिला जात असल्याचे बोलले जात आहे. हे काम अत्यंत शिस्तीत व गुप्तपणे सुरू असून त्यासाठी काही युवक व युवतींची (बंटी-बबली) उमेदवारांनी निवड केली आहे.मतदारांकडून मतदानाचे आश्वासन उमेदवारांचे पदाधिकारी घेत आहेत. प्रत्यक्षात मतदार कोणाला कौल देणार हे मात्र निवडणूक निकालानंतरच पुढे येणार आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com