Manipur Violence News : डबल इंजिनचं सरकार, तरीही मणिपूर अशांतच ; ठाकरे गटाचा मोदींवर निशाणा

Sanjay Raut ON Manipur Violence : मणिपूर दीर्घकाळ अशांत आणि हिंसेच्या वणव्यात सापडणे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने परवडणारे नाही.
Manipur Violence:
Manipur Violence: Sarkarnama

Sanjay Raut ON Manipur Violence : गेल्या काही दिवसांपूर्वी मणिपूरमधील परिस्थिती बिकट होती. राज्यातील अनेक भागात हिंसाचाराच्या ठिणगीने उग्र रूप धारण केले होते. आहे. अजूनही मणिपूरमधील हिंसक कारवायांच्या घटनांमध्ये कमी झालेल्या नाहीत, यावर ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून निशाणा साधला आहे.

"मणिपूरसारखे संवेदनशील सीमावर्ती राज्य परत शांततेच्या रुळावर आणणे हे एक आव्हान आहे. केंद्रातील राज्यकर्ते ते कसे पेलतात यावर मणिपूरसह ईशान्य हिंदुस्थानमधील शांतता आणि स्थिरता अवलंबून आहे," असे 'सामना'च्या अग्रलेखात म्हटलं आहे. "मणिपूर दीर्घकाळ अशांत आणि हिंसेच्या वणव्यात सापडणे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने परवडणारे नाही," अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

Manipur Violence:
Devendra Fadnavis on Sharad Pawar Prediction : फडणवीस म्हणाले, "पवारांचे 'ते' स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही..

"मणिपूरमधील हिंसक कारवाया, जाळपोळीच्या घटनांमध्ये कमी आली आहे, असा केंद्र सरकारचा दावा आहे. त्यात काही प्रमाणात तथ्य असेलही, परंतु मंगळवारचा इरोसेम्बा येथे रुग्णवाहिका पेटवून त्यातील निष्पाप मायलेकाचा बळी घेण्याचा निर्घृण प्रकार या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे," असा प्रश्न अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे.

"मणिपूर आणि केंद्रात भाजपचेच सरकार असूनही ही ठिणगी महिनाभरानंतरही विझलेली नाही. मणिपूर आजही अशांतच आहे," असं म्हणत मोदी सरकारवर टीकास्त्र डागले आहे.

Manipur Violence:
Sharad Pawar Appreciated Nitin Gadkari : मोदी सरकारमधील कोणता मंत्री तुम्हाला आवडतो ? ; शरद पवारांनी घेतलं 'हे' नाव..

काय म्हटलं आहे 'सामना'च्या अग्रलेखात

  • मणिपूर हे छोटे राज्य असले तरी देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने तो अत्यंत महत्त्वाचा प्रांत आहे.

  • तेथेही अतिरेकी आणि फुटीरवाद्यांचे अनेक गट पूर्वापार सक्रिय आहेत. त्यांना शत्रू राष्ट्रांची फूस असते.

  • सर्व प्रकारची मदत ते या गटांना करीत असतात.

  • महिन्यानंतरही मणिपूरमधील जातीय भावनांचा उद्रेक कमी झालेला नाही.

  • हिंसाचारात आतापर्यंत 100 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 300 पेक्षा जास्त जखमी झाले आहेत.

  • एकूण 272 मदत छावण्यांमध्ये 37 हजार 450 पेक्षा जास्त लोक सध्या तेथे राहत आहेत.

  • हे सर्व सुरक्षा यंत्रणांच्या संरक्षण कवचात असले तरी इरोसेम्बा येथील भयंकर घटनेने हे शरणार्थी सुरक्षित नाहीत.

  • हे तर स्पष्ट झालेच, शिवाय माणुसकी, परस्पर प्रेम, दया यांना कुठलेच स्थान नाही हेदेखील दिसून आले.

    (Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com