शिराळ्यात एकच आवाज : `मी ठरवलयं, भाऊंना निवडलयं`

शिराळ्यात एकच आवाज : `मी ठरवलयं, भाऊंना निवडलयं`

शिराळा : महाआघाडी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी आपला उमेदवारी अर्ज हजारो कार्यकर्त्यांच्या समवेत अलोट गर्दीच्या साक्षी भरला. `मी ठरवलंय भाऊंना निवडलयं`चा नारा सर्वत्र घुमत होता.

प्रथम आंबा मातेचे दर्शन घेऊन  रॅलीस सुरुवात झाली  ही रॅली अंबामाता मंदिरापासून सोमवार पेठ कुरणे गल्ली गुरुवार पेठ मार्गे बस स्थानकापासून तहसील कार्यालयात पर्यंत नेण्यात आली.

यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, राजवर्धन पाटील, भगतसिंग नाईक, सम्राटसिंह नाईक, अमरसिंह नाईक, राजेंद्र  नाईक, सुनीता नाईक, माजी जिल्हापरिषद अध्यक्ष देवराज पाटील,लिंबाजी पाटील, रणजित पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात ही मिरवणूक काढण्यात आली. या रॅलीत ढोल ,ताशा,लेझीमच्या ठेक्यावर तरुणाईने ठेका धरला होता. कार्यकर्त्यांनी रॅलीच्या मार्गावर पोत्याने फुलांची उधळण करून मानसिंगराव नाईक यांचे स्वागत केले.

मानसिंगराव नाईक यांचा अर्ज भरण्यासाठी कार्यकर्त्यांनी उत्साहात गर्दी केली असून प्रत्येकाच्या डोक्यावर असणारी पांढरी टोपी व त्यावर मी ठरवलयं भाऊंना निवडलयं हे घोषवाक्य लिहिल्याने वेगळीच रंगत आली होती. महिलांनी त्या टोप्या घातल्या होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com