मराठा समन्वयक रमेश केरेंचा विष घेत आत्महत्येचा प्रयत्न...

Ramesh Kere : "आशा, अक्षर भैया, गौरी मला माफ करा..."
maratha reservation
maratha reservationsarkarnama

मुंबई : सोशल मीडियावर माझी बदनामी केल्याच्या आरोप करत मराठा समाजाचे समन्वयक रमेश केरे यांनी फेसबुक लाईव्ह दरम्यान विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. माझी कथित ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून माझी बदनामी केली जात आहे. मात्र, मी आजपर्यंत समाजासाठी प्रामाणिक काम केलं आहे. मात्र, आता हे माझं तुमच्याशी फेसबुकच्या माध्यमातून शेवटच संभाषण असणार आहे, असे रमेश केरेंनी आपल्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमाद्वारे म्हटलं आहे.

maratha reservation
संघाच्या शाखेतून बहूजन बाहेर पडू लागल्याने भागवतांकडून पापक्षालनाचे वक्तव्य...

केरे हे फेसबुक लाईव्ह करत असतांना भावूक झालेले पाहायला मिळाले होते. मराठा बांधवांशी संवाद साधत असतांना "आशा, अक्षर भैया, गौरी मला माफ करा, मी आजवर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळण्यासाठी प्रामाणिकपणे काम करत आलोय, मात्र सोशल मीडियावर माझी जाणून बुजून बदनाम केलं जात आहे. हे माझं शेवटचं फेसबुक लाईव्ह असेल" असं म्हणत त्यांनी विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला आहे.

maratha reservation
अंधेरी पूर्व पोटनिवडणूक बिनविरोध होणार? राज ठाकरेंच्या पत्रावर फडणवीसांची सूचक प्रतिक्रिया

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत होती. त्यामध्ये मराठा समन्वयक रमेश केरे यांचा उल्लेख होता. मराठा क्रांती मोर्च्या वेळी कसे आर्थिक व्यवहार झाले आणि हे आंदोलन संपवण्यासाठी कसा प्रयत्न झाला,अशी चर्चा त्यानंतर सुरू झाली आहे. यावर केरेंनी मराठा समाजाची माफी मागत मी असं कोणतंही कृत्य केलं नसल्याचं सांगितले मात्र त्यांच्यावर आरोप होतच आहेत. यामुळे त्यांनी हे पाऊल उचललं, असे त्यांनी सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com