Santosh Deshmukh : धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून हटवा; मराठा क्रांती मोर्चा आक्रमक; अजितदादांची घेतली भेट

Baramati News : केज तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा प्रश्न हिवाळी अधिवेशनात गाजला. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, यासाठी मराठा क्रांती मोर्चाने पुढाकार घेतला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामतीत दिले.
Santosh Deshmukh
Santosh Deshmukh Sarkarnama
Published on
Updated on

Baramati News: संतोष देशमुख हत्येसाठी दोषी असलेल्या सर्वांवर कडक कायदेशीर करा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे. या संदर्भात पोलीस तपास सुरू आहे, तपासामध्ये जे दोषी आढळतील, त्या सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही अजित पवार यांनी मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला दिली.

मराठा सरपंच बांधव संतोष देशमुख यांची परळी येथे हत्या करण्यात आली. ही हत्या केवळ संतोष देशमुख हे मराठा समाजाचे आहेत व त्याचा सर्वात मोठा अडसर आपल्या पक्षाचे आमदार व मंत्री धनंजय मुंडे यांना होत होता, त्यामुळे त्यांनी इतर गुंडांमार्फत म्हणजेच वाल्मीक कराड व इतर गुंडामार्फत ही हत्या केल्याचे दिसून येत आहे, असे अजितदादा यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Santosh Deshmukh
Vasantrao Naik: शेती, मातीवर श्रद्धा असणारे मुख्यमंत्री

या हत्येमधील गुन्हेगार व आरोपींचे निकटवर्तीय असलेले मंत्री धनंजय मुंडे यांना तत्काळ अटक करा, त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, या गुन्ह्यांचा तपास जलद गतीने करा, अशी मागणी मराठा समाजाने केली आहे. या निवेदनावर सुनील सस्ते, ॲड विजय तावरे, सचिन शिंदे, विकास खोत आदींच्या सह्या आहेत.

Santosh Deshmukh
Jitendra Awhad: फडणवीसांची 'मनोरूग्ण नवी टेक्नीक'; आव्हाडांना नेमकं काय म्हणायचंय!

संतोष देशमुख प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने एसआयटीची स्थापना करण्याची घोषणा हिवाळी अधिवेशनात केली आहे. तर दुसरीकडे जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत धनंजय मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ नये, अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती. पण सर्वांचा विरोध डावलून अजित पवारांनी मुंडेंना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com