Maratha Reservation : फसती हैं दुनिया फसानेवाला चाहिए! आरक्षणाच्या अधिसूचनेवरून दवेंची टीका

Anand Dave : हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांची मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया...
Anand Dave, Manoj Jarange-Patil
Anand Dave, Manoj Jarange-PatilSarkarnama
Published on
Updated on

Pune News : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील हे गेल्या सात महिन्यांपासून लढत होते. अखेर त्यांच्या लढाईला यश आले असून सरकारने मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढला आहे. यानंतर मराठा समाजामध्ये आनंदाचे वातावरण आहे. समाजबांधवांकडून ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे या अधिसूचनेवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. याबाबत आता हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मराठ्यांना दिलेले आरक्षण (Maratha Reservation) म्हणजे फँसती दुनिया फँसानेवाला चाहिए, कोणतेही आश्वासनपूर्ती न करता हा मोर्चा गुंडाळण्यात आला आहे, अशी टीका मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणावरून आनंद दवे (Anand Dave) यांनी सरकारवर केली आहे. मराठा समाजाला यातून काहीही नवीन मिळालेले नाही, सरकारकडून फक्त शब्दच्छल करण्यात आलेला आहे, अशी हिंदू महासंघाची (Hindu Mahasangh) भूमिका असल्याचं दवे यांनी स्पष्ट केले आहे.

Anand Dave, Manoj Jarange-Patil
Maratha Reservation : ...तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार; जरांगेंनी सरकारला ठणकावलं

सगेसोयरे आणि रक्ताच्या नात्यात यापूर्वीपासूनच आरक्षण मिळत होते. सरकारकडून (Maharashtra Government) काढण्यात आलेल्या अधिसूचनेवर 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवण्यात आलेले. म्हणजे पुढील पंधरा दिवस हरकती सूचना यावर घेण्यात येणार आहेत. या हरकतींवर नंतर आक्षेप घेण्यात येतील आणि हे प्रकरण पुन्हा एकदा रेंगाळणार आहे. मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळावं, अशी मनोज जरांगेंची भूमिका होती, ती नंतर सग्यासोयऱ्यांपर्यंत येऊन का थांबली, असा सवाल दवे यांनी उपस्थित केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांनी आंदोलन स्थगित करताना सरकारने फसवलं तर परत येऊ, असा इशारा दिला आहे. याचा अर्थ असा आहे, की जरांगे यांना आतासुद्धा खात्री नाही की आपल्याला व्यवस्थित आरक्षण मिळालंय किंवा नाही. त्यामुळे कोणतेही आश्वासनपूर्ती न करता हा मोर्चा गुंडाळण्यात आला आहे, असा आरोप दवे यांनी केला आहे. ‘तेरी भी जय मेरी भी जय,’ असं करीत आपण दोघंही विन विन सिच्युएशन येऊ, असं ठरवून केलं गेलंय की काय, असं वाटत असल्याचं दवे यांनी सांगितले.

दरम्यान, आनंद दवे हे नेहमीच वादाच्या केंद्रस्थानी राहणारे व्यक्तिमत्त्व आहे. यापूर्वीही त्यांची अनेक विधानं ही वादग्रस्त ठरली आहेत. त्यामुळे त्यांनी केलेलं हे विधान पुन्हा एकदा वादासाठी कारणीभूत ठरणार का हे पाहावे लागेल.

(Edited By - Rajanand More)

R...

Anand Dave, Manoj Jarange-Patil
OBC Leaders Statement : चंद्रकांतदादांचे धक्कादायक विधान; ‘ओबीसी नेत्यांची विधाने ही राजकीयदृष्ट्या बोलण्यासाठी असतात’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com