Maratha Reservation : सरकारसाठी 'करो या मरो' स्थिती! मराठा सर्व्हेतील कर्मचाऱ्यांची पहिल्याच दिवशी दांडी

Pimpri Chinchwad Corporation : महापालिकेने तीस टक्के कर्मचारी सर्व्हेच्या प्रशासनाच्या कामावर परिणाम
Pimpri Chinchwad Maratha
Pimpri Chinchwad MarathaSarkarnama
Published on
Updated on

Pimpri Chinchwad Maratha News : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे आपल्या लाखो आंदोलकांसह मुंबईकडे चालले आहेत. मराठ्यांच्या मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने आरक्षणासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी सात दिवसांचे सर्व्हेक्षण सुरू झाले आहे. यातूनच आरक्षणाबाबत 'करो या मरो'ची स्थिती झाल्याचे स्पष्ट होते. यातच सर्व्हेक्षणाला सर्व्हर डाऊनचा खोडा निर्माण होत असूनही पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्याच दिवशी तब्ब पाच टक्के कर्मचाऱ्यांनी दांडी मारली होती.

मराठा समाजाला आरक्षण द्यायचे की नाही, हे ठरविण्यासाठी या समाजाचे आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासणी सुरू करण्यात आलेली आहे. राज्य सरकारच्या मागासवर्गीय आयोगाच्या आदेशानुसार उद्योगनगरीत 23 जानेवारीपासून सर्व्हेक्षण सुरू झालेले आहे. या सर्व्हेक्षणाच्या पहिल्याच दिवशी सर्व्हर डाऊनच्या तांत्रिक अडचणी आल्या. अशातच सर्व्हेक्षण करणाऱ्या पाच टक्के कर्मचाऱ्यांची गैरहजेरी लावल्याने कामात अडथळ्यांची शर्यत सुरू झाल्याची चर्चा आहे.

Pimpri Chinchwad Maratha
Maratha Vs OBC : सरकारची धडधड आणखी वाढणार; मराठ्यांनंतर आता ओबीसीही मुंबईत धडकणार?

मराठा समाजाचे (Maratha Reservation) सर्व्हेक्षण 23 ते 31 जानेवारी या कालावधीत पूर्ण करण्याचे आदेश आहेत. त्यासाठी पिंपरी महापालिकेने 157 सुपरवायझर आणि एक हजार 732 प्रगणक असे एक हजार 889 कर्मचारी नेमले आहेत. त्यांनी आपले काम सुरू केले. त्यासाठी त्यांना एक दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले. मात्र, पहिल्याच दिवशी त्यातील 130 जणांनी दांडी मारली. त्यांना नोटीस देण्यास आली असून त्यावरील खुलासा समाधानकारक वाटला नाही, तर पुढील कारवाईचा इशारा सर्व्हेचे नोडल अधिकारी तथा महापालिकेचे सहायक आयुक्त अविनाश शिंदेंनी दिला आहे.

Pimpri Chinchwad Maratha
Yadrav Gramsabha : माजी मंत्र्यांच्या गावात महिन्यातच दोनदा राडा; नेमकं काय झालं ?

या पाहणीच्या कामासाठी पगाराव्यतिरिक्त मानधन दिले जाणार आहे. तरी अनेकांनी त्याकडे पाठ फिरवली. दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (Pimpri-Chinchwad) सात हजारांपैकी जवळजवळ दोन हजार म्हणजे तीस टक्के कर्मचारी, अधिकारी सर्व्हेक्षणात गुंतले आहेत. याचा प्रशासकीय कामकाजावर विपरित परिणाम सुरू झाला आहे. शहरातील पाणीपुरवठा, आरोग्य, वैद्यकीय, अग्निशमन अशा अत्यावश्यक सेवा वगळता इतर कर्मचारीसंख्येपैकी जवळजवळ निम्मे कर्मचारी या सर्व्हेत गुंतले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शहरातील सर्व साडेसहा लाख मिळकतींत जाऊन सर्व्हेक्षण केले जाणार आहे. तेथील मराठा कुटुंबांचीच माहिती घेतली जाणार आहे, असे नोडल अधिकारी शिंदेंनी सांगितले. त्यामुळे या सर्व्हेसाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. त्यामुळे तो वेळेत पूर्ण होण्यास मदत होणार आहे, असे ते म्हणाले. फक्त आठवडाभरात अंदाजे ३० लाख लोकसंख्येच्या शहराची ही पाहणी अवघे दोन हजार कर्मचारी करू शकतील का, यावरही त्यांनी हे मनुष्यबळ पुरेसे असल्याचे स्पष्ट केले.

(Edited by Sunil Dhumal)

R...

Pimpri Chinchwad Maratha
BJP Politics : 'चलो अयोध्या' म्हणजे निवडणुकीपूर्वी मतांची बेगमी; राज्यात नेमकं चाललंय तरी काय?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com