Supriya Sule : महाराष्ट्रात हाल सोसते मराठी! भाषा गौरव दिनीच सुप्रिया सुळेंनी सांगितली मराठीची व्यथा, म्हणाल्या "पुणे विमानतळावरच..."

Marathi Announcements at Airports : राज्यभरात आज मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जात आहे. मात्र, याच दिवशी आपल्याच राज्यात मराठी भाषेचा आवाज कसा दाबला जातोय हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उघडकीस आणलं आहे.
Supriya Sule
Supriya SuleSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 27 Feb : राज्यभरात आज मराठी भाषा (Marathi) गौरव दिन साजरा केला जात आहे. मात्र, याच दिवशी आपल्याच राज्यात मराठी भाषेचा आवाज कसा दाबला जातोय हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या (NCP SP) खासदार सुप्रिया सुळे यांनी उघडकीस आणलं आहे.

सुळे (Supriya Sule) यांनी आपल्या एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी पुणे विमानतळावर मराठीतून उद्घोषणा होत नसल्याचा दावा केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं की, पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतून उद्घोषणा होत नसल्याचे आढळून आले आहे.

Supriya Sule
Pune Swaragate Bus Stand : "हे पाहून जीव जळतोय..." स्वारगेट ST स्थानकात तोडफोड केलेल्या वसंत मोरेंना उद्धव ठाकरेंचा फोन, म्हणाले...

महाराष्ट्रात असूनही जर मराठी भाषेतून उद्घोषणा होत नसेल तर ही अतिशय खेदाची बाब आहे. तर पुणे (Pune) विमानतळावर मराठी भाषेतून उद्घोषणा व्हाव्या या मागणीचे निवेदन पुण्यातील शरद क्रीडा सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांच्या वतीने देण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

"मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. याखेरीज मराठी अस्मिता जपण्यासाठी तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार होण्यासाठी राज्यातील प्रत्येक विमानतळावर हिंदी व इंग्रजी भाषेसह मराठीतूनही उद्घोषणा होणे आवश्यक आहे.

माझी नागरी हवाई उड्डाणमंत्री के राममोहनजी नायडू यांना नम्र विनंती आहे की, कृपया आपण या मागणीची नोंद घेऊन याबाबत संबंधित विभागाला आवश्यक त्या सूचना द्याव्या"; अशी मागणी देखील त्यांनी आपल्या ट्विटमधून केली आहे. त्यावर आता राज्य सरकार आणि केंद्र सरकार काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com