Maval Crime : मावळातील तिसऱ्या खूनाचाही झाला उलगडा,पत्नीनेच केला गेम

Maval Crime : मावळातील तिसऱ्या खूनाचाही झाला उलगडा,पत्नीनेच केला गेम
Maval Crime News
Maval Crime News Sarkarnama
Published on
Updated on

Maval Crime News : रविवारी (ता. ४) भरदुपारी गहूंजे (ता.मावळ,जि.पुणे) येथे एका व्यक्तीचा खून झाला होता. त्या खूनाचा तपास लागला आहे. पत्तीनेच पतीचा काटा काढल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

काल भरदुपारी (ता.४) सूरज राजेंद्र काळभोर (वय २९, रा.आकुर्डी,पिंपरी-चिंचवड) याचा निर्घूण खून करण्यात आला होता. त्याची पत्नी अंकिता (वय २८)हिने दगडाने ठेचून, गळा चिरून आणि फावड्याने डोक्यात घाव घालून केल्याचे पोलिसांनी शोधून काढले.

Maval Crime News
NCP Meeting IN Pune : अजितदादांनी कार्यकर्त्यांना दम भरला ; तिकीटावरुन भांडलात तर कानाखाली आवाज काढेन..

पतीचा खून केल्यानंतर चार लुटारूंनी आम्हा दोघांवर हल्ला करून लुटल्याचा बनाव अंकिताने केला होता. मात्र, त्यात तिला खरचटल्याएवढीही जखम न झाल्याचे पोलिसांनी हेरले. त्यामुळे तिच्यावरच संशळ बळावला. अन् अखेर तिचे बिंग फुटले. अंकिताला अटक केली आहे. आज (सोमवारी) वडगाव मावळ येथील न्यायालयात तिला हजर करणार असल्याचे तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यवान माने यांनी `सरकारनामा`ला सांगितले.

Maval Crime News
Hanumant Pawar Slams Mungantiwar: पवारांचा एकेरी उल्लेख, मुनगंटीवारांवर काँग्रेस संतप्त ; 'सत्तेच्या मस्तीतून ..'

चारित्र्यावरून सूरज संशय घेत असल्याने त्याच्यात व अंकितात भांडणे होत होती. त्याची परिणती थेट खूनात झाली.दरम्यान, दोन महिन्यांत दोन राजकीय खूनांसह काल तिसरा खून झाल्याने मावळ तालुका पुन्हा एकदा हादरला होता. त्यातही पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त म्हणून विनयकुमार चौबे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील व त्यातही मावळातील गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले आहे. तेथे एकामागोमाग एक खून होत आहेत.

Maval Crime News
Shivsena - BJP Alliance: आगामी निवडणुकांबाबत मुख्यमंत्र्याचं महत्वाचं टि्वट ; यापुढच्या काळात भाजपसोबत...

सूरज हा पिंपरी-चिंचवडमधील एका पॉलीटेक्निक कॉलेजात चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून काम करीत होता. तर, त्याची पत्नी अंकिता ही सुद्धा पिंपरी-चिंचवड महापालिकेत याच पदावर आहे.यावर्षी २७ एप्रिलला या दोघांचे लग्न झाले होते.

आकुर्डीत राहणाऱ्या सुरजच्या आईने याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार काल सूरज हा पत्नीसह प्रतीशिर्डी शिरगाव (ता.मावळ) येथील साईंच्या दर्शनासाठी गेला होता. तेथून अंकिताने त्याला आपल्या माहेरी गहूंजेला वडिलांच्या शेतावर नेले. तेथे बेसावध सूरजवर तिने घरातून आणलेल्या सूरीने वार केले. शेतातील फावड्याने डोक्यात घाव घातले. नंतर दगडाने डोके ठेचले होते.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com