Maval Politics: निधी कोणाचा? मावळात शेळके-भेगडे यांच्यात श्रेयाची लढाई

Sunil Shelke vs Bala Bhegade:मावळ तालुक्यात विकास निधी कुणी आणला यावरून आमदार सुनील शेळके आणि बाळा भेगडे यांच्यात संघर्ष सुरु आहे. नागरिकांनी विकासावर भर देण्याची मागणी केली आहे.
Sunil Shelke Vs Bala Bhegde
Sunil Shelke Vs Bala Bhegde Sarkarnama
Published on
Updated on

विजय सुराणा

तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यात विकासकामांपेक्षा ‘श्रेय कोणाचे?’ यावरच राजकारण तापल्याचे चित्र समोर आले आहे. तब्बल २.२१ कोटी रुपयांच्या निधीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelkeः आणि भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडे (Bala Bhegade) यांच्यात चांगलाच वाद पेटला आहे.

हा निधी नेमका कुणाच्या प्रयत्नातून आला, यावरून दोन्ही नेत्यांकडून परस्परविरोधी दावे करण्यात येत आहेत. आमदार शेळके यांनी हा निधी पालकमंत्री सुनेत्रा पवार ( Sunetra Pawar) यांच्या पुढाकारातून मिळाल्याचे सांगितले. तर दुसरीकडे भेगडे यांनी हा निधी ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या माध्यमातून आणल्याचा दावा केला आहे.

Sunil Shelke Vs Bala Bhegde
Sarkari Naukri: सरकारी बदलीचे नियम बदलले! राजकीय दबाव आणल्यास कारवाई होणार; असा असेल प्राधान्यक्रम

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे या वादाला अधिकच धार मिळाली असून, एकाच विकासकामावरून वेगवेगळे दावे केल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नागरिकांनी स्पष्ट भूमिका मांडत, “कोणाचे श्रेय कुणीही घ्या; पण निधी आणा आणि कामे वेळेत व दर्जेदार करा,” अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. निधीची चढाओढ कायम राहिल्यास निधीत वाढ होऊन त्याचा फायदा तालुक्याच्या विकासाला होईल, अशीही भावना नागरिकांनी व्यक्त केली.

Sunil Shelke Vs Bala Bhegde
Nandurbar News: पोलिसांची सिंघम स्टाईल एन्ट्री! बालविवाहाचा प्लॅन उधळला; वऱ्हाडींची पळापळ, पालकांविरुद्ध गुन्हा दाखल

मावळमध्ये विकासकामांपेक्षा श्रेयवादाला अधिक महत्त्व दिले जात असल्याची टीका होत असून, आगामी काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यात महायुतीचे सरकार असले तरी मावळात मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचे दिसून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com