Maval Politics: शेळके-भेगडेंचा खेळ फसला! मतदारांना ‘अंधश्रद्धेच्या धाग्याने’ बांधण्याचा प्रयत्न; मनगटावर धागे, गळ्यात ताईत

Maval Local Body Election 2025 Sunil Shelke vs Bala Bhegade:राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी एका कार्यक्रमात भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडे यांच्याकडे युतीसाठी हात पुढे केला होता, पण आता ही युतीची शक्यता नसल्याचे चित्र आहे
Maval Local Body Election 2025 Sunil Shelke vs Bala Bhegade
Maval Local Body Election 2025 Sunil Shelke vs Bala BhegadeSarkarnama
Published on
Updated on

विजय सुराणा

तळेगाव दाभाडे (पुणे) : स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीची घोषणा दोन-तीन दिवसात होणार आहे. राजकीय रणधुमाळीला जोर वाढला आहे. युती-आघाडीत उमेदवारी मिळेल म्हणून अनेक इच्छुकांचा पक्षप्रवेश सोहळा होत आहे. काही ठिकाणी स्वबळावर लढण्याचा इशारा युती-आघाडीतील घटकपक्षांनी दिला आहे. मावळातील राजकारणात काही दिवसांपूर्वी युतीच्या शक्यतेची चर्चा होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी एका कार्यक्रमात भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडे यांच्याकडे युतीसाठी हात पुढे केला होता, पण आता ही युतीची शक्यता नसल्याचे चित्र आहे

अशातच उमेदवारीसाठी स्पर्धा तीव्र झाल्याने काही इच्छुकांनी पक्षातील कार्ड कमिटीच्या नावाने अंगारे फुंकणे, वेगवेगळ्या देव-देवतांना नवस बोलणे, तसेच महिला मतदारांसाठी देवदर्शन सहलींचे आयोजन सुरू केले आहे. काही ठिकाणी साड्या, नारळ, भेटवस्तू वाटप करून मतदारांना ‘श्रद्धेच्या धाग्याने’ बांधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मनगटावर धागे, गळ्यात ताईत

अनेक उमेदवारांच्या मनगटावर लाल, पिवळे, केशरी आणि काळे धागे झळकत आहेत; काहींच्या गळ्यात माळा, हातात जपमाळा दिसतात. हे दृश्य पाहून 'ही श्रद्धा आहे की सत्तेची भीती' असा प्रश्न मतदारांना पडला आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी काही नेते ‘दैवी राजकारणाचा’ आधार घेत असल्याचे काही राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

Maval Local Body Election 2025 Sunil Shelke vs Bala Bhegade
NCP News: रुपाली ठोंबरेंकडून चाकणकरांना संपवण्याची भाषा! नेमका काय आहे वाद

विकास कुठे आहे?

गावागावांत आता देवदर्शन, नवसपूर्ती आणि धार्मिक मेळावे यांची रेलचेल आहे, पण विकासाच्या चर्चा मात्र मागे पडल्या आहेत. रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य यावर बोलणारे नेते कमी, आणि अंगारे फुंकणारे जास्त दिसत आहेत,” अशी प्रतिक्रिया नागरिकांतून येत आहे.

अंधश्रद्धा की राजकीय रणनीती?

काही नेते हे आपले ‘श्रद्धा आणि संस्कार’ म्हणून सांगतात, पण त्याचबरोबर काहींचा विश्वास आहे की हे अंधश्रद्धेचे प्रदर्शन मतदारांच्या भावना कुरवाळण्यासाठीच आहे. विज्ञाननिष्ठ दृष्टी वाढवण्यासाठी प्रशासन आणि शैक्षणिक संस्था प्रयत्नशील आहेत; पण त्याचवेळी राजकीय नेते ‘दैवी उपायां’वर विश्वास ठेवत असल्याने मावळच्या राजकारणात अंधश्रद्धेचा पगडा वाढतोय, अशी चर्चा सर्वत्र आहे.

अखेर प्रश्न एकच

अंधश्रद्धेचा धागा की विकासाचा मार्ग? युती अपयशी ठरल्याने आता प्रत्येक पक्षात उमेदवारांची चढाओढ वाढली आहे. 'धागे, नवस सोडा; शहराचा विकास कधी करणार, असा प्रश्न मतदारांना पडला आहे.

मामा–भाच्यांचा खेळ फसला

मावळातील राजकारणात काही दिवसांपूर्वी युतीच्या शक्यतेची चर्चा होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी एका कार्यक्रमात भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडे यांच्याकडे युतीसाठी हात पुढे केला होता. त्यावेळी भेगडे म्हणाले होते, “दोन्ही हात पुढे करतो, मावळात युती होईल”. मात्र काही दिवसांतच दोन्ही पक्षांकडून काही उमेदवार जाहीर झाल्याने ‘मामा-भाच्यांची टाळी’ घोषणेपुरतीच मर्यादित राहिली.यामुळे मावळात युतीची शक्यता संपुष्टात आली आहे. दोन्ही पक्षात इच्छुकांची संख्या झपाट्याने वाढली आहे.

मावळ तालुक्यातील लोणावळा नगरपरिषद, तळेगाव दाभाडे नगरपरिषद, वडगाव नगरपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजप यांच्यात थेट लढत होणार हे आता जवळजवळ स्पष्ट झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com