NCP News: रुपाली ठोंबरेंकडून चाकणकरांना संपवण्याची भाषा! नेमका काय आहे वाद

Rupali Thombare vs Rupali Chakankar: रूपाली चाकणकर यांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे, त्यात चुकल्या आहेत आणि चुकीला माफी नाही. हगवणे प्रकरणात देखील मी बोलल्यानंतर चाकणकर यांनी माझा जुना व्हिडिओ दाखवला होता.
Rupali Thombare vs Rupali Chakankar
Rupali Thombare vs Rupali ChakankarSarkarnama
Published on
Updated on

Pune News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन महिला नेत्यांचा संघर्ष आता टोकाला पोहोचला असल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा असलेल्या रूपाली चाकणकर यांच्यावर पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष असलेल्या रूपाली पाटील ठोंबरे यांच्याकडून सडकून टीका केली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून रूपाली पाटील ठोंबरे या सातत्याने चाकणकरांनी विरोधात आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळत आहेत. सुरुवातीला पाटील ठोंबरे यांनी आपल्या कुटुंबीय विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी एका महिलेला चाकणकरांनी फूस लावण्याचा आरोप केला होता.

त्यानंतर आज फलटण येथील महिला डॉक्टर प्रकरणांमध्ये रूपाली चाकणकर यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन पिडीतीच्या चारित्र्याचा हणन केल्याचा आरोप करीत राजीनामा मागितला आहे.

यावेळी 'सरकारनामा'शी बोलताना रूपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या, "रूपाली चाकणकर यांच्या भूमिकेमुळे नाहक पक्षाची बदनामी होत आहे. आणि पक्ष ते सहन करणार नाही, याबाबत वरिष्ठांकडून लवकरच निर्णय घेतला जाईल. महिला आयोग ही कोणाची जहागीर नाही, महिलांना न्याय देण्यासाठी आयोग आहे.

Rupali Thombare vs Rupali Chakankar
Shalarth-ID-Scam: 672 शिक्षकांना दणका; पोलिस करणार पगाराची वसुली

रूपाली चाकणकर यांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे, त्यात चुकल्या आहेत आणि चुकीला माफी नाही. हगवणे प्रकरणात देखील मी बोलल्यानंतर चाकणकर यांनी माझा जुना व्हिडिओ दाखवला होता. त्यामुळे समोरचा जर मला घाण घाण शिव्या देऊन बोलत असेल तर 'मी बोलू का बाळा' अशा घाण घाण शिव्या देऊ नको. परंतु मी तशी नाही त्यांनी जर एक शिवी दिली तर मी दहा शिव्या देणार असल्याचे ठोंबरे म्हणाल्या.

मी आत्महत्या करून चाकणकरांना माझं चारित्र्य ,हनन करण्याची संधी देणार नाही. मी चाकणकरांना संपवणार म्हणजेच चाकणकरांच्या विकृतीला संपवणार, ही विकृती चालणार नाही असं रूपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com