Maval Lok Sabha Analysis: मावळ शिवसेनेचाच! पण, शिंदेंचा की ठाकरेंचा?

Waghere Vs Barne: राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार यांच्यासोबत गेलेले व लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस अगोदर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलेले संजोग वाघेरे पाटील यांना ठाकरे यांनी आयात करून उमेदवारी दिली.
Maval Lok Sabha Analysis
Maval Lok Sabha AnalysisSarkarnama

Pune News: मावळ लोकसभा निवडणुकीत यंदाचा सामना हा शिवसेना विरुद्ध शिवसेना असा झाला. एकीकडे एकनाथ शिंदे यांची शिवसेना होती तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची सेना. एकीकडे विद्यमान खासदार तर दुसरीकडे आयात केलेला उमेदवारसह ठाकरे रिंगणात उतरले होती. त्यामुळे सलग चौथ्यांदा या भागामध्ये शिवसेनेचाच खासदार होणार हे निश्चित आहे. मात्र तो उमेदवार ठाकरेंच्या सेनेचा का शिंदेंचा सेनेचा हे चित्र चार मला स्पष्ट होणार आहे.

निवडणूक आयोगाने मंगळवारी अंतिम मतदानाची टक्केवारी जाहीर केली आहे. त्यानुसार एकूण मावळ लोकसभा मतदारसंघात 54.87% मतदान झाला आहे. निवडणूक आयोगाकडून ईव्हीएम मशीन मंगळवारी सकाळपर्यंत सर्व मतमोजणीच्या ठिकाणी अर्थात बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात पोहोच झालीआहेत. त्यामुळे आता फक्त प्रतीक्षा चार जून रोजी होणाऱ्या मतमोजणीची असणार आहे.

Maval Lok Sabha Analysis
Dhangekar Vs Mohol: पर्वती धंगेकरांना साथ देणार की घात करणार?

मावळ लोकसभेचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर सलग तीन वेळा या ठिकाणी शिवसेनेचाच उमेदवार विजयी झाला आहे. त्यामुळे हा मतदारसंघ एक प्रकारे शिवसेनेचा गड बनला आहे. मात्र दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडल्यानंतर विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडून विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणं पसंत केलं.

निवडणूक आयोग व न्यायालयीन लढाईनंतर ‘शिवसेना’ नाव व ‘धनुष्यबाण’ चिन्ह शिंदे सनेला मिळाले. त्यामुळे ठाकरे यांना नवीन नाव ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष’ व ‘मशाल’ चिन्ह घेऊ यंदाच्या लोकसभेच्या आखाड्यात उतरावं लागलं. त्यांची काँग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत महाविकास आघाडी होती. तर दुसरीकडे राष्ट्रवादीमध्येही फूट पडून अजित पवार भारतीय जनता पक्षासोबत आले. त्यांची महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना सबंध महाराष्ट्र प्रमाणे मावळ मतदारसंघात ही रंगला.

एकनाथ शिंदे यांनी विद्यमान खासदार बारणे यांना पुन्हा संधी देत निवडणूक रिंगणात उतरवल आहे. तर, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार यांच्यासोबत गेलेले व लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस अगोदर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलेले संजोग वाघेरे पाटील यांना ठाकरे यांनी आयात करून उमेदवारी दिली. त्यामुळे शिंदेंची शिवसेनाविरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असा सामना रंगला.

मावळच्या लढाईमध्ये बारणेंच्या मागे मोठी ताकद उभी असल्याचे पाहायला मिळालं. बारणेसोबत महायुतीतील भाजपचे दोन व पाठिंबा दिलेला अपक्ष एक, राष्ट्रवादीचे दोन, शिवसेनेचा एक असे सहा आमदार, माजी मंत्री बाळा भेगडे व स्वतः विद्यमान खासदार या बारणे यांच्या जमेच्या बाजू होत्या.

सुरुवातीला एकतर्फी वाटणारा सामना वाघिरे यांनी शेवट शेवट चांगलाच रंगतदार केला. त्यांनी उत्तम प्रकारे प्रचार यंत्रणा चालवत झंजावती दौरे केले. वाढती महागाई, बेरोजगारी यामुळे केंद्र सरकारकबाबतची नाराजी वाघेरे यांचे सगेसोयरे व राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील फुटीची शरद पवार व उद्धव ठाकरे यांना असलेली सहानुभूती या वाघेरे यांच्या जमेच्या बाजू होत्या. त्यामुळे मावळातील लोकांनी नेमकं कुठल्या गोष्टींना महत्त्व दिलं हे चार जून स्पष्ट होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com