Maval Lok Sabha Exit Poll : ठाकरेंनी वाघेरेंना धाडले; पण मावळात बारणेंचीच डरकाळी ?

Uddhav Tahckeray Vs Eknath Shinde : ठाकरेंनी तोडीसतोड उमेदवार देऊन मावळात रंगत आणली होती. मतदान झाल्यानंतर बारणे आणि वाघेरे या दोघांनीही लाखाच्या मताधिक्याचे दावे केले आहेत.
Maval Lok Sabha Analysis
Maval Lok Sabha AnalysisSarkarnama

Maval Political News : मावळ लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खासदार श्रीरंग बारणेंवर विश्वास दाखवला. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या बाजूने राष्ट्रवादी अजित पवार गटातून आलेल्या संजोग वाघेरेंना संधी दिली. या थेट लढतीत श्रीरंग बारणे हॅटट्रीक करणार असल्याचा अंदाज टीव्ही 9 पोलस्ट्राट एक्झिट पोलने वर्तवला आहे. परिणामी वाघेरेंचे थेट खासदारकीचे स्वप्न भंगणार असल्याची बोलले जात आहे.

मावळात 54.87 टक्के मतदान झाले असून हे 2019 मधील मतदानापेक्षा कमी आहे. या मतदारसंघातील विधानसभेच्या चिंचवड (52.20) कर्जत (61.40), मावळ (55.42), पनवेल (50.05), पिंपरी (50.55) आणि उरण (67.07) मतदारसंघात असे मतदान झाले आहे. हे मतदान कुणाच्या पथ्यावर पडणार याची चर्चा होती.

मावळात 2019 मध्ये एकतर्फी निवडणूक होऊन शिवसेनेचे श्रीरंग बारणेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव पार्थ यांचा सुमारे दोन लाखांनी पराभव केला होता. या वेळी मात्र ठाकरेंनी तोडीसतोड उमेदवार देऊन मावळात रंगत आणली होती. मतदान झाल्यानंतर बारणे आणि वाघेरे या दोघांनीही लाखाच्या मताधिक्याचे दावे केले आहेत. यात मात्र बारणे बाजी मारताना दिसत असल्याचे एक्झिट पोलनुसार स्पष्ट होताना दिसत आहे.

Maval Lok Sabha Analysis
MP Amol Kolhe : "अमोल कोल्हे भाजप वा शिंदे गटात आले तर आढळरावांची समजूत घालावी लागेल"

या निवडणुकीत वाघेरे आणि बारणे असे दोघेही मराठा उमेदवार असल्याने मतदारसंघात आंदोलनाचा प्रभाव दिसून आला नाही. या उमेदवारांचा विजय घाटावरच्या आणि घाटाखालच्या विधानसभा मतदारसंघातील मतदानावर अवलंबून आहे. पिंपरी, चिंचवड, मावळ या घाटावरील तीनही विधानसभा मतदारसंघात या दोघांनाही मतदान झाले. त्यामुळे घाटाखालील पनवेल, कर्जत आणि उरणमधून कोण किती लीड घेणार, यावरच बारणे आणि वाघेरेंचे खासदारीकचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे बोलले जात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Maval Lok Sabha Analysis
Kolhapur, Hatkanangle Exit Poll : कोल्हापुरात 'महाराज'; हातकणंगलेत सरूडकरांची 'पाटीलकी!'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com