Maval Politics: मावळच्या आमदार, खासदारांचे 'या' प्रश्नावर एकमत; शेळकेनंतर बारणेंचीही जोरदार बॅटिंग

Shrirang Barne, Sunil Shelke: इको सेन्सिटीव्ह झोन उठविण्यासाठी आमदार शेळकेनंतर खासदार बारणेंचीही मागणी
Shrirang Barne and Sunil Shelke
Shrirang Barne and Sunil ShelkeSarkarnama
Published on
Updated on

Pimpri News: मावळ तालुक्यातील (जि.पुणे) निगडे, कला, कोळेवाडी हा भाग इको सेन्सिटिव्ह (पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील) म्हणून जाहीर करण्यात आला असून तेथील जमिनीवर 2017 पूर्वीच तसे शिक्के पडले आहेत. त्यामुळे तेथे उद्योग येत नसून शिक्के पडल्याने जमिनही कसता येत नसल्याची तेथील शेतकऱ्यांची व्यथा स्थानिक आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) मावळचे सुनील शेळकेंनी विधानसभेत नुकतीच मांडली.

त्यानंतर स्थानिक खासदार शिवसेनेचे (शिंदे गट) मावळचे श्रीरंग बारणे यांनी याप्रश्नी आणखी एक पाऊल पुढे टाकत हा इको सेन्टिटीव्ह झोनच हटविण्याची मागणी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे आज केली. यामुळे गेल्या काही दिवसांत एकमेकांवर सडकून टीका करणाऱ्या या आमदार, खासदारांचे याप्रश्नी मात्र, एकमत झाल्याचे दिसून आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shrirang Barne and Sunil Shelke
Loksabha Election : पुणे लोकसभेची पोटनिवडणूक झाल्यास बसणार 'या' मतदारांना फटका

तळेगाव दाभाडे नगरपरिषद (ता.मावळ) सीईओ बदली आणि मावळच्या लोकसभेच्या उमेदवारीवरून बारणे आणि शेळकेंत नुकताच कलगीतुरा रंगला. आगामी लोकसभेला मावळमधून आपणच उमेदवार असल्याचे बारणेंनी जाहीर केल्यानंतर त्यावर तिसऱ्यांदा उमेदवारी मागण्यापूर्वी आपल्या नऊ वर्षाच्या कामाचा लेखाजोगा बारणेंनी मावळवासियांना द्यावा, अशी मागणी शेळकेंनी केली होती.

त्याला उत्तर देताना शेळकेंचे वक्तव्य हे राजकीय सूड आणि व्देषातून असल्याचे सांगत त्याला उत्तर देण्याची गरज नाही, असा पलटवार बारणेंनी केला होता. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे कार्यक्षम सीईओ विजयकुमार सरनाईक यांची मुदतपूर्व बदली करून अकार्यक्षम एन.के.पाटील यांना आणून बारणे घरात बसले आहेत, असा हल्लाबोलही शेळकेंनी केला होता. त्यामुळे तळेगावचे तीन तेरा वाजल्याचा आरोप त्यांनी केला होता.

दरम्यान, या तू,तू,मैं,मैं नंतर शेळकेंनी नागपूर येथे सुरु असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांवरील चर्चेत भाग घेताना केंद्र व राज्यात सरकार असूनही इको सेन्सिटीव्ह झोनचा प्रश्न सुटत नसेल, तर निगडे, कला, कोळेवाडीच्या शेतकऱ्यांना सांगायचे काय, असा प्रश्न विचारला होता. त्यानंतर तीन दिवसांत बारणेंनी हा प्रश्न थेट केंद्र सरकारकडेच मांडला.

मावळमधील कल्हाट, निगडेगाव ‘इको-सेन्सिट‌िव्ह’ झोनमधून वगळा, अशी मागणी त्यांनी केली. कमी उत्पन्न असलेली तेथील कुटुंबे, कोरडवाहू शेतीवर अवलंबून असल्याने या गावांच्या विकासाला चालना देण्यासाठी त्यांचा समावेश तळेगाव एमआयडीसीच्या टप्पा क्रमांक चारमध्ये करण्यात आला.

पण, ती इको सेन्सिटीव्ह झोनमध्ये मोडत असल्याने तेथे उद्योग आले नाहीत, याकडे बारणेंनी केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांचे लक्ष वेधले. त्यासाठी ही गावे इको-सेन्सिटिव्ह झोनमधून औद्योगिक झोनमध्ये बदलण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला दिला आहे. त्याला मान्यता द्यावी, त्यामुळे गावे व परिसराचा विकास होईल, असे बारणे यांनी म्हटले आहे.

(Edited by- Ganesh Thombare)

Shrirang Barne and Sunil Shelke
Pune News : ATS ची धडक कारवाई, बांगलादेशी नागरिकांना पकडले; गुन्हे दाखल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com