Women Reservation In Maval : मावळ, शिरूरला महिला खासदाराची प्रतीक्षा; विधानसभेत कोटा पूर्ण, काय आहे गणित?

Pimpri, Chinchwad, Bhosari Assembly and Shirur Lok Sabha : मतदारसंघ पुनर्रचना झाली तर दिग्गजांची होणार पळापळ
Woman Reservation
Woman ReservationSarkarnama
Published on
Updated on

Pune Political News : देशात आता चर्चा असली तरी जनगणना, मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर महिला आरक्षण लागू होणार आहे. या विधेयकामुळे महिलांना लोकसभा, विधानसभेत ३३ टक्के आरक्षण मिळणार आहे. त्यानुसार लोकसभेत महिलांची संख्या १८१ वर पोचणार आहे. या आरक्षणामुळे मावळ लोकसभेसह आणि पिंपरी-चिंचवड आणि भोसरी यापैकी एका विधानसभेत महिलांना संधी मिळणार आहे. परिणामी महापालिकेप्रमाणे पिंपरी- चिंचवड शहरातील महिलांची ताकद लोकसभा आणि विधानसभेत वाढल्याची चर्चा सुरू झालेली आहे. दरम्यान, येथील काही दिग्गजांची अडचण होऊन त्यांच्यावर इतर मतदारसंघ शोधण्याची वेळ येणार असल्याचेही बोलले जात आहे. (Latest Political News)

(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

Woman Reservation
Supriya Sule On Ajit Pawar : अमित शाहांचं कौतुक, अजितदादांना टोमणा, तर फडणवीसांवर टीका; काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

लोकसभेला, पिंपरी- चिंचवड शहर हे शिरूर आणि मावळ अशा दोन लोकसभा मतदारसंघांत विभागलेले आहे. भोसरी हे शिरूर, तर चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघ मावळमध्ये येतात. या दोन्ही लोकसभा मतदारसंघांतून आतापर्यंत पुरुषच खासदार झालेले आहेत. तेथे महिलांना आरक्षण कायद्याचा लाभ होणार आहे. मतदारसंघ पुनर्रचनेत मावळ किंवा शिरूरला आरक्षण पडले, तर येथे महिलांना खासदार होण्याची संधी मिळणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांतील ५० टक्के आरक्षणामुळे पिंपरी महापालिकेत महिलांचे प्राबल्य आहे. मात्र, विधानसभा आणि लोकसभेला ते शहरात नसल्याने तेथे महिला आमदार, खासदार आतापर्यंत नव्हत्या. शहरात तीन विधानसभा आहेत. आतापर्यंत तेथे महिला आमदार नव्हत्या. मात्र, आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) आमदार झाल्या आहे. अश्विनी जगताप यांच्या रूपाने शहराला प्रथमच महिला आमदार मिळाल्या. त्यातून शहराचा विधानसभेतील ३३ टक्के महिला सदस्याचा कोटा पूर्ण झाला आहे. पिंपरी आणि भोसरी या उर्वरित दोन मतदारसंघांत अनुक्रमे अण्णा बनसोडे आणि महेश लांडगे हे आमदार आहेत.

हा कायदा लागू झाल्यानंतर शहरातील पुरुष आमदार असलेल्या सध्याच्या दोन मतदारसंघांपैकी (पिंपरी आणि भोसरी) एका ठिकाणी आरक्षण पडले, तरी तेथेही महिला आमदार होणार आहे. एकूणच या कायद्यामुळे अनेक दिग्गजांचा पत्ता कट होणार असून, त्यांना शेजारच्या मतदारसंघात अतिक्रमण करण्याची पाळी येणार आहे. (Maharashtra Political News)

दरम्यान, आरक्षण लागू झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेप्रमाणे उद्योगनगरीत विधानसभा आणि मावळ लोकसभील ताकदीने महिलाराज येईल, अशी चर्चा आहे. राजकीय आरक्षणाचा पूर्ण लाभ महिलांना मिळणार आहे. सध्या काही नगरसेविकेंच्या आडून त्यांचे पती, वडील, भाऊ, दीर कारभार पाहतात. लोकसभा, विधानसभेत असा प्रकार टाळता आला, तर महिला आरक्षणाचा खरा फायदा होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Woman Reservation
BJP MLA Tanaji Mutkule : आमदार मुटकुळेंकडून मारहाण; नरसी संस्थानच्या विश्वस्तांचा आरोप...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com