BJP MLA Tanaji Mutkule : आमदार मुटकुळेंकडून मारहाण; नरसी संस्थानच्या विश्वस्तांचा आरोप...

Marathwada Political News : या प्रकरणी अद्याप दोन्ही बाजूंकडून पोलिसांत कुठलीही तक्रार देण्यात आलेली नाही.
MLA Tanaji Mutkule News
MLA Tanaji Mutkule NewsSarkarnama
Published on
Updated on

Hingoli Political News : संत नामदेवांचे जन्मस्थान असलेल्या नरसी नामदेव विश्वस्त मंडळाच्या बैठकीत भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे व त्यांच्या समर्थकांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप विश्वस्त अंबादास गाडे यांनी केला आहे. (Hingoli) ही घटना १८ सप्टेंबर रोजी विश्वस्तांच्या बैठकीत घडल्याचे समोर आले आहे.

(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

MLA Tanaji Mutkule News
Harshvardhan Jadhav Met Jarange Patil: पन्नास टक्क्यांच्या आतले आरक्षण मागू नका, खुल्या वर्गासाठीही आरक्षण मागा...

दरम्यान, या वेळी आजी-माजी आमदार आणि त्यांच्या समर्थकांमध्येही वाद झाल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. आमदार तानाजी मुटकुळे (Hingoli) यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप नरसी नामदेव संस्थानचे विश्वस्त अंबादास गाडे यांनी केला आहे. (BJP) तर मुटकुळे यांनी गाडे यांनी अरेरावीची भाषा करत शिवीगाळ केल्याचा आरोप केला.

या प्रकरणी अद्याप दोन्ही बाजूंकडून पोलिसांत कुठलीही तक्रार देण्यात आलेली नाही. नरसी नामदेव संस्थान समितीच्या कामांचा हिशेब घेण्यासाठी १८ रोजी बैठक घेण्यात आली होती. (Marathwada) या वेळी आमदार तानाजी मुटकुळे आणि विश्वस्त अंबादास गाडे यांच्यात वादावादी झाल्याचे सांगितले जाते.

काही मुद्द्यांवरून वाद विकोपाला गेला आणि मुटकुळे व त्यांच्या समर्थकांनी गाडे यांना खुर्च्या फेकून मारल्या. यात पाठीला दुखापत झाल्यामुळे गाडे यांना हिंगोलीच्या सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते. सध्या नामदेव महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. या कामासंदर्भातील हिशेबावरूनच हा प्रकार घडल्याचे सांगितले जाते.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com