Mawal Lok Sabha Election : पिंपरी-चिंचवडमध्ये आतापर्यंत कमी मतदान; फटका कोणाला, वाघेरे की बारणे ?

Political News : पिंपरी-चिंचवडमध्येच आतापर्यंत कमी मतदान झाले असल्याने या कमी मतदानाचा फटका कोणाला बसणार याची चर्चा जोरात सुरु आहे. विशेषतः पिंपरी-चिंचवडमध्येच श्रीरंग बारणे, संजोग वाघिरे यांचे मतदान असल्याने त्यांचा हा बालेकिल्ला समजला जातो.
Sanjog Waghere Patil, Shrirang Barne
Sanjog Waghere Patil, Shrirang BarneSarkarnama

Mawal News : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी चुरशीने सोमवारी मतदान होत आहे. महायुतीकडून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे तर महाविकास आघाडीकडून माजी महापौर संजोग वाघेरे निवडणूक लढवीत आहेत. पुणे आणि रायगड जिल्ह्यात विभागलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये ६ विधानसभा मतदारसंघ येतात. श्रीरंग बारणे, संजोग वाघेरे यांचे प्राबल्य असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्येच आतापर्यंत कमी मतदान झाले आहे.

पिंपरी-चिंचवडमध्येच आतापर्यंत कमी मतदान झाले असल्याने या कमी मतदानाचा फटका कोणाला बसणार याची चर्चा जोरात सुरु आहे. विशेषतः पिंपरी-चिंचवडमध्येच श्रीरंग बारणे (Shrirang Barne), संजोग वाघेरे (Sanjog Waghere) यांचे मतदान असल्याने त्यांचा हा बालेकिल्ला समजला जातो. मात्र याच विधानसभा मतदारसंघात कमी मतदान झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (Mawal Loksbaha Election)

Sanjog Waghere Patil, Shrirang Barne
Pune Lok Sabha News : धक्कादायक! काँग्रेस शहराध्यक्षाच्या नावे बोगस मतदान; तक्रारींचा पाऊस...

काही दिवसापूर्वीच चिंचवड मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती. त्यामध्ये भाजपच्या अश्विनी जगताप विजयी झाल्या होत्या. त्यामुळे या कमी मतदानाचा फटका कोणाला बसणार या बाबत उत्सुकता शिगेला पोचली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात सकाळाच्या सत्रात चांगले मतदान झाले. सकाळी सात ते दुपारी एक या सहा तासात 27.14. टक्के मतदान झाले.

पुणे आणि रायगड जिल्ह्यात विभागलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो.त्यामध्ये कर्जतमध्ये सर्वाधिक 29.47 टक्के मतदान झाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पनवेलमध्ये 26.93 टक्के, उरणमध्ये 29.06 टक्के, चिंचवड 26.12 टक्के, पिंपरी 23.96 टक्के आणि मावळ विधानसभा मतदारसंघात 28.03 टक्के मतदान झाले. दुपारी एक वाजेपर्यंत 27.14 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघात सकाळच्या पहिल्या दोन तासात 5.38 टक्के, दुसऱ्या दोन तासात 14.87 टक्के तर तिसऱ्या दोन तासात 27.14 टक्के मतदान झाले आहे. सकाळच्या सत्रात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत होते. मात्र त्यानंतर टक्का घसरल्याचे जाणवत आहे. त्यामुळे कमी प्रमाणात झालेल्या या मतदानाची टक्केवारी कोणाच्या पथ्यावर पडणार याची उत्सुकता ताणली गेली आहे.

Sanjog Waghere Patil, Shrirang Barne
Mawal Lok Sabha News : मावळमध्ये पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही दाखल; पण 27 जणांनी नेले 49 अर्ज

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com