Pune News : राज्यातील मेडिकल कॉलेजांत 'एमबीबीएस'ला प्रवेश मिळवून देतो, असा शब्द देऊन विद्यार्थी पालकांची फसवणूक करणारे रॅकेट उघडकीस आले आहे. प्रवेशापोटी फसवणूक झालेल्या आठ ते दहा जणांनी आता पोलिसांकडे धाव घेतली आहे. त्यांना २ कोटी २ लाख ४० हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणात तिघांवर हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार उघडकीस आल्याने मेडिकल कॉलेज प्रवेशाचा मुद्दा चर्चेत आला आहे. दरम्यान, फसवणूक झालेली लोकं आणि रकमेचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. परिणामी प्रवेशाच्या नावाखाली लुटणाऱ्या टोळीची व्याप्ती वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Latest Political News)
सिद्धार्थ रावत, शुभम सिंह आणि सृष्टी काकडे असे फसवणूक करणाऱ्यांची नावे आहेत. यातील शुभम सिंहने प्रत्येक पालकाला आपले वेगवेगळे नाव सांगितले होते. याबाबत एक पालक म्हणाले, 'आम्ही आरोपींच्या दोन महिन्यांपासून संपर्कात होतो. दरम्यान, त्यांचे प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वारंवार फोन येत होते. मात्र, २९ सप्टेंबरला शेवटची यादी जाहीर होण्यापूर्वीच त्यांचे फोन येणे बंद झाले. यादीत नाव आले नसल्याने शुक्रवारी ऑफिसला आलो, त्यावेळी ते बंद होत. रावतला फोन केला असता लागला नाही. त्यानंतर व्हॉट्सअॅपवर बोललो तर त्याने 'वेट' म्हणून सांगितले. यानंतर शुभमने शनिवारी आम्हाला प्रवेश मिळेल, असे सांगितले. त्यानंतर त्यांच्याशी कुठलाही संपर्क झाला नाही. यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने हिंजवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.' (Maharashtra Political News)
हा प्रकार गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असल्याचे फसवणूक झालेल्यांनी सांगितले. संबंधित पालकांना, विद्यार्थ्यांना कंपनीतर्फे टेलिकॉलरद्वारे राज्यात कुठेतरी प्रवेश मिळवून देऊ, असे सांगण्यात आले. त्यानुसार पालकांनी भेट घेतली असता, आरोपींनी बजेट विचारले. कुठे घ्यायचे विचारले. त्यानुसार त्यांनी संबंधित जिल्ह्यातील चार-पाच महाविद्यालयांची यादी दिली. कॉलेजनुसार त्यांची फी सांगितली. पुण्यासाठी ८०-९०, तर पुण्याबाहेरील महाविद्यालयांसाठी ६०-७० लाखांच्या रकमेचा आकाडा सांगितल्याची माहिती पालकांनी दिली. (Pune News)
आरोपींनी पालकांना रक्कम दिल्यानंतर करार करू असे सांगितले होते. पहिल्या वर्षाच्या फीचा डीडी किंवा चेक देण्यास आरोपींनी सांगितले. त्यानंतर प्रवेश करून देऊ, असे अश्वासनही दिले होते. त्यानुसार दोन-तीन दिवसांत संबंधित लोकांनी प्रक्रिया केली. कुणी चेक, डीडी दिले तर कुणी आरोपींच्या खात्यावर पैसे पाठवले. आता आरोपींशी कुठलाही संपर्क होत नसल्याने पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली. आरोपींनी सुमारे ५० ते ६० जणांना गंडा घातला आहे. त्यांच्याकडून लाखो रुपये उकळून ही टोळी पसार झालेली आहे. पुण्यातील या प्रकारामुळे एमबीबीएस प्रवेशापोटी राज्यात हे रॅकेट सक्रिय असल्याची भीती आहे. परिणामी फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या प्रकारामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.