Rahul Gandhi On Narendra Modi : राहुल गांधींची मोठी खेळी; मोदींच्या भाषणाचं हत्यार वापरत करणार भाजपचाच 'गेम' !

Congress Vs BJP : मोदींच्या फ्री स्टाईल भाषणाचे राजकीय भांडवल करण्याची काँग्रेसची खेळी आहे.
Rahul Gandhi On Narendra Modi
Rahul Gandhi On Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Pune : गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळापासून मणिपूर पेटलंय. त्याचे तीव्र पडसाद लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात देखील उमटले. काँग्रेसप्रणित विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीने मोदी विरोधात वातावरण तापवण्यासाठी जंग जंग पछाडले. २०१८ नंतर पुन्हा एकदा मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणत भाजपला उघडे पाडण्याचाही पुरेपूर प्रयत्न केला.

एवढ्यावरच न थांबता काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधींनी मणिपूरच्या मुद्द्याला हात घालत भाजपवर तिखट वारदेखील केले. याउलट काँग्रेससह सर्व विरोधकांचा हिशेब चुकता करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील जोरदार बॅटिंग केली. मात्र, याचवेळी विरोधकांनी सभात्याग केला. तरीही मोदींनी विरोधकांना कधी कोपरखळ्या, कधी टीका टिप्पणी करत काँग्रेसवर आक्रमण कायम ठेवले. पण आता काँग्रेस नेते राहुल गांधीं(Rahul Gandhi)नी मोदींच्या भाषणाचा मुद्दा हाती घेत भाजपला खिंडीत पकडण्यासाठी मैदानात उतरले आहे.

Rahul Gandhi On Narendra Modi
BJP vs Amol Mitkari News : आमदार मिटकरींना संसदीय कामकाजाचा अभ्यास किती? भाजपचा पलटवार !

पावसाळी अधिवेशनाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीं(Narendra Modi)च्या भाषणावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधींनी आता मोदींना लक्ष्य केले आहे. त्यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत गांधी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी काल संसेदत 2 तास 15 मिनिटे बोलले. शेवटी फक्त 2 मिनिटे ते मणिपूरवर बोलले. मणिपूर अनेक महिन्यांपासून जळत आहे. निरपराध लोकांची हत्या केली जात आहे. बलात्कार होत आहेत. पण पंतप्रधान निर्लज्जपणे हसत आहेत, त्यांचे जोक सुरु आहेत. हे त्यांना शोभत नाही असा हल्लाबोल त्यांनी केला.

मणिपूर जळावं हीच पंतप्रधानांची इच्छा

काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले, मणिपूरमध्ये सुरु असलेला मूर्खपणा भारतीय सैन्य दोन दिवसांत थांबवेल. पण मणिपूर जळावं अशी पंतप्रधानांची इच्छा आहे. त्यांना आग विझवायची नाही.

Rahul Gandhi On Narendra Modi
Nawab Malik Bail : नवाब मलिकांचं राजकारण फिरणार; पवारसाहेब की अजितदादांच्या नव्या समीकरणात सामील होणार?

राहुल गांधी म्हणाले, मणिपूरमध्ये मैती भागात ज्यावेळी मी गेलो होतो. त्यावेळी मला स्पष्टपणे सांगण्यात आलं, माझ्या सुरक्षेमध्ये कोणी कुकी असेल, तर त्याला इथे आणू नका. आम्ही त्याची हत्या करु. आम्ही कुकींच्या भागात गेलो, त्यावेळी त्यांनी सुद्धा हेच सांगितलं. कुठला मैती इथे आणला, तर आम्ही त्याला गोळी घालू. त्यामुळे मणिपूर एक राज्य नाही. त्याची दोन भागात विभागणी झाली. राज्याची हत्या करण्यात आलीय. म्हणून मी म्हणालो, मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या करण्यात आली असेही काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अविश्वास प्रस्तावाला उत्तर देताना जवळपास दोन तास १५ मिनिटे भाषण केले. यावेळी त्यांनी कोट्या, स्टाईल, शब्द, शेरोशायरी, कोपरखळ्या, टीका टिप्पणीवरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. मोदींच्या फ्री स्टाईलचे राजकीय भांडवल करण्याची काँग्रेसची खेळी आहे. आगामी काळात राहुल गांधींच्या मोदी आणि भाजप(BJP)विरोधातील आक्रमणाची धार आजची धार कायम राहणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Rahul Gandhi On Narendra Modi
Rahul Gandhi On Narendra Modi : पेटलेल्या मणिपूरवर मोदी निर्लज्जपणे हसत राहिले; राहुल गांधी भडकले

४०० चे ४० खासदार....

मोदींनी आपल्या भाषणात काँग्रेसला इतिहासाचे दाखले देत जोरदार टोले लगावले होते. याचवेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवारी विरोधी पक्षांना लोकसभेत प्रत्युत्तर दिले. अविश्वास प्रस्तावाच्या निमित्ताने विरोधकांनी केलेल्या आरोपांचा मोदींनी आपल्या भाषणात चांगलाच समाचार घेतला. मोदी म्हणाले, काँग्रेस इतकी अहंकारी आहे की त्यांना जमीन दिसत नाही. पण लंका हनुमानाने नाहीतर अहंकाराने जाळली. काँग्रेसच्या अहंकारामुळेच त्यांचे ४०० चे ४० खासदार झाले असा घणाघातही पंतप्रधान मोदींनी लोकसभेत केला.

एकच फेल प्रॉडक्ट वारंवार लाँच...

काँग्रेसला झोपेत, स्वप्नातही मोदीच दिसतात. पण २०२४ ला लोक विरोधीपक्षांना झोप लागू होणार नाही.याचवेळी राहुल गांधींवर निशाणा साधताना 'मोहब्बत की दुकान नाही तर लूट की दुकान' असल्याचेही मोदी यावेळी म्हणाले होते. मला काँग्रेसची अडचण माहिती आहे. अनेक वर्षांपासून एकच फेल प्रॉडक्ट वारंवार लाँच करत आहेत. यांचे लाँचिंग फेल होते, आणि हे देशातील जनतेशी द्वेष करतात. मात्र पीआरवाले मोहब्बत की दुकानचा प्रचार करतात असेही मोदी म्हणाले होते.

(Edited BY Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com