

Ajit Pawar Minority Department: विकास कामांबाबत दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना अजित पवारांनी झापल्याचे आपण पाहिले आहे, अनेक अधिकारी अजितदादांच्या या कार्यपध्दतीमुळे कामचुकारपणा करण्यास धजावत नसत, पण ज्या दिवशी अजितदादांनी आपल्यातून अकाली एक्झिट घेतली त्याच दिवशी काही असंवेदनशील अधिकाऱ्यांनी मंत्रालयात बसून चक्क 75 फाईलींवर सह्या केल्याचे उघडकीस आले आहे. अजितदादांच्या अपघाती मृत्यूला अवघे काही तास उलटलेले असताना त्यांच्याकडे असलेल्या अल्पसंख्यांक खात्यात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी हा दिव्य प्रताप केला आहे.
अजितदादांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा असताना निर्ढावलेपणा या सरकारी अधिकाऱ्यांची या फाईंलींवर सह्या कशा केल्या असा जाब अजितदादांचे समर्थक विचारत आहेत. या घटनेनंतर मंत्रालयातील प्रशासकीय यंत्रणेवर संताप व्यक्त करण्यात येत आहे. ऑगस्ट महिन्यापासून या विषयांची प्रकिया स्थगिती होती, तरीही अधिकाऱ्यांनी त्यावर लगेचच सह्या करुन या फाईली निकाल्या काढल्या. अजित पवार यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय दुखवटा जाहीर केल्यानंतरही मंत्रालयात बसून अडकलेल्या फाईलींवर सह्या करणारे अधिकारी कोण? असा सवाल विचारण्यात येत आहे.
या फाईंली अल्पसंख्याक खात्याशी संबंधित होत्या. राज्यातील ७५ शिक्षण संस्थांना फायलींवर सह्या करून अल्पसंख्यांक दर्जा दिल्याचे समोर आले आहे. इकडे राज्यात दुखवटा असताना दुसरीकडे अल्पसंख्याक विकास विभागात मात्र एक वेगळाच प्रकार सुरू होता. अत्यंत गंभीर बाब म्हणजे, दुखवटा आणि सुट्टीच्या दिवशी तसेच कार्यालयीन वेळ संपल्यानंतरही रात्री उशिरापर्यंत या विभागात डिजिटल प्रमाणपत्रांचे वाटप सुरू होते, असा आरोप युवक काँग्रेस ने केला आहे.
अजित पवारांच्या अपघाती मृत्यूला अवघे काही तास उलटलेले असताना त्यांच्याकडे असलेल्या अल्पसंख्यांक खात्यात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिव्य प्रताप केला. ज्या फायलींना ऑगस्ट महिन्यापासून स्थगिती देण्यात आली होती किंबहुना त्यावर निर्णय घेण्यात आले नव्हते, त्याच फायलींवर अधिकाऱ्यांनी मागे पुढे न पाहता स्वाक्षऱ्या केल्या.
काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमताने डिजिटल स्वाक्षरीचा वापर करून अल्पसंख्याक दर्जाची प्रमाणपत्रे वाटप केल्याचा आरोप युवक काँग्रेसचे अक्षय जैन यांनी केला आहे. या आरोपानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. जैन यांच्या आरोपात किती तथ्य आहे? याचा तपास केला जाण्याची शक्यता आहे. पण राज्यात दुखवटा असताना असा गैरप्रकार झाल्याने राज्य सरकारवर टीका होत आहे.
शाळांना पहिले प्रमाणपत्र अजितदादांच्या अपघाताच्या दिवशी २८ जानेवारीला दुपारी तीन वाजून नऊ मिनिटांनी दिले गेले.
२८ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत देण्यात आलेली अशी ७५ प्रमाणपत्रे उपलब्ध आहेत.
या प्रमाणपत्रांना अल्पसंख्यांक विभागाच्या ऑनलाईन सिस्टीममध्ये मंजुरी मिळाली, ती वेळ देखील नमूद आहे.
कार्यालयांची वेळ संपल्यानंतरही साडे सहा, सात वाजताही फायलींवर सह्या झाल्या आहेत.
सेवादास महाराज शिक्षक प्रसारक मंडळ यवतमाळला अजित पवार यांच्या निधनादिवशीच प्रमाणपत्र देण्यात आले.
अजित पवार यांच्या मृत्यूदिवशीच सात शाळांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
'पोदार'च्या २५ शाळांना २९ जानेवारी या एकाच दिवशी २५ शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्यात आलेला आहे.
स्वामी शांती प्रकाश आणि देव प्रकाशच्या चार शाळांना देखील लाभ देण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.