SRPF परीक्षेतही गैरप्रकार : दोघांना अटक

हडपसरला एका उमेदवाराच्या जागेवर त्याचा भाऊ परीक्षा देत असल्याचे उघडकीस आले.
एसआरपीएफ परीक्षा

एसआरपीएफ परीक्षा

सरकारनामा
Published on
Updated on

पुणे : राज्य राखीव पोलिस दलासाठी (SRPF) रविवारी शहरात लेखी परीक्षा (Examination) घेण्यात आली. या परीक्षेमध्ये कोथरुड (kothrud) येथे मोबाईलद्वारे प्रश्‍नपत्रिकेची कॉपी करणाऱ्यास एका उमेदवाराला पोलिसांनी अटक केली. तर हडपसरला (Hadapsar) एका उमेदवाराच्या जागेवर त्याचा भाऊ परीक्षा देत असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे त्यास अटक करुन त्याच्यासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

<div class="paragraphs"><p>एसआरपीएफ परीक्षा</p></div>
नदी सुधारची बैठक टाळणाऱ्या पुणे पालिकेच्या आयुक्तांना केंद्रीय मंत्री धारेवर धरतात तेव्हा...

कोथरुड पोलीस ठाण्यात केतन विठ्ठल लखवाड, (वय 24, रा. मंबापुरवाडी, खुलताबाद, औरंगाबाद) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल असून त्यास अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र विद्यापीठ मंडळाच्या व इतर परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांवर प्रतिबंध करण्यासाठीच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. कोथरुड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरुड येथील शंकरराव मोरे विद्यालयामध्ये रविवारी ‘एसआरपीएफ’ जामखेड ग्रुपसाठी लेखी परीक्षा घेण्यात येत होती.

<div class="paragraphs"><p>एसआरपीएफ परीक्षा</p></div>
शरद पवारांची मर्जी राखण्यासाठीच छगन भुजबळ ओबीसी आरक्षणाबाबत आग्रही नाहीत 

परीक्षा दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सुरू झाली. त्यानंतर साडेबारा वाजण्याच्या सुमारास उमेदवारांना प्रश्‍नपत्रिका वाटण्यात आल्या. त्यावेळी केतन लखवाड हा त्याच्या मोबाईलमध्ये प्रश्‍नपत्रिकेचे छायाचित्र काढत होता. तसेच कॉपी करीत होता. हा प्रकार तेथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या निदर्शनास आला. त्यांनी त्यास तत्काळ ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा तो परीक्षेचा पेपर कॉपी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यात आली.

हडपसर येथील घटनेप्रकरणी विशाल गबरुसिंग बहुरे (रा. जोडवाडी, औरंगाबाद) यास अटक केली असून त्याच्यासह आणखी एकाविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अनुप पवार (वय ४२, रा. सासवड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पर्यवेक्षक आहेत.

"एसआरपीएफ'ची हडपसरमधील एस.एम.जोशी महाविद्यालयमध्ये रविवारी परीक्षा सुरू होती. त्यावेळी ते उमेदवारांचे प्रवेशपत्र तपासत होते. तेव्हा, बहुरे हा त्याच्या भावाच्या जागेवर परीक्षा देण्यासाठी उपस्थित असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्याचबरोबर त्याने परीक्षेमध्ये कॉपी करण्यासाठी आणलेली दोन इलेक्‍ट्रॉनिक वस्तुही ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यास हडपसर पोलिसांनी अटक केली. त्याच्यासह त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून इलेक्‍ट्रॉनिक वस्तु जप्त करण्यात आल्या.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com