सहा आमदार पोहचले जिल्हा बॅंकेत सातवे पवार मात्र अडकले निवडणुकीत...

अशोक पवार (Ashok Pawar) यांना प्रचारात गुंतविण्याची शिरूर तालुक्यातील नेत्यांची खेळी
Ashok Pawar-Gavhane

Ashok Pawar-Gavhane

Sarkarnama

शिक्रापूर : पुणे जिल्ह्यातील सात आमदार जिल्हा बॅंकेत (PDCC) थेट बिनविरोध संचालक म्हणून पोहचले असताना शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार (Ashok Pawar) यांना मात्र निवडणुकीचा सामना करावा लागला आहे. राष्ट्रवादीचेच माजी अध्यक्ष आबासाहेब गव्हाणे यांनी त्यांच्याविरोधात शड्डू ठोकला आहे.

सर्वच प्रकारच्या निवडणूकांचा दांडगा अनुभव असलेल्या आमदार पवारांसाठी तालुक्यातून विद्यमान संचालक निवृत्तीआण्णा गवारेंसह बहुतेक सर्वच इच्छुकांनी आपल्या तलवारी म्यान केल्या ख-या, पण आबासाहेब गव्हाणे मात्र शेवटपर्यंत आपल्या उमेदवारीवर ठाम राहिल्याने पवार-गव्हाणे अशी लढत निश्चित झाली असून निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

Ashok Pawar-Gavhane

अखेरच्या क्षणी दत्तात्रेय भरणे अन् जगदाळे बिनविरोध...

पुणे जिल्ह्यातून दिलीप वळसे पाटील (आंबेगाव-शिरुर), अजित पवार (बारामती), संग्राम थोपटे (भोर), दिलीप मोहिते (खेड), संजय जगताप (पुरंदर) आणि दत्तात्रेय भरणे (इंदापूर) अशा सहा तालुक्यांतून विद्यमान आमदार जिल्हा बॅकेवर संचालक म्हणून बिनविरोध म्हणून नियुक्त झाले. विशेष म्हणजे माजी आमदार व विद्यमान अध्यक्ष रमेशआप्पा थोरात (दौंड) यांनीही आपले संचालकपद बिनविरोध करवूनच घेतले. मात्र याच पठडीत शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी आज अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशीपर्यंत शिकस्त करुनही तालुका बिनविरोध होवू शकला नाही.

Ashok Pawar-Gavhane

अजित पवारांनी तिढा सोडवला : संजय काळे जिल्हा बॅंकेवर बिनविरोध

शिरुरमधील `अ`गटातून विद्यमान ज्येष्ठ संचालक निवृत्तीआण्णा गवारे, माजी संचालक दिवंगत अरुणआबा गायकवाड यांचे चिरंजीव स्वप्निल गायकवाड, घोडगंगाचे माजी संचालक पांडूरंग थोरात, विद्यमान संचालक राजेंद्र गावडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवीबापू काळे आदींनी आज आमदार पवारांसाठी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. या शिवाय भाजपा पुरस्कृत असलेले विनोद सोनवणे यांनीही अनपेक्षितपणे आपला अर्ज मागे घेतला. पर्यायाने निवडणूक बिनविरोध होण्याच्या तोंडावर थांबलेली असताना अर्ज माघारीसाठी दोन तास जादा अवधी दिला गेला तरीही आबासाहेब गव्हाणे यांनी मात्र आपला अर्ज मागे घेतला नाही.

Ashok Pawar-Gavhane

जिल्हा बॅंक हे तर निमित्त : शशिकांत शिंदेंचा `कार्यक्रम` करण्याचा मुहूर्त जुनाच !

अपक्ष आबासाहेब सर्वपक्षीय उमेदवार...?

आमदार अशोक पवारांना थेटपणे भाजपा पुरस्कृत उमेदवार म्हणून विनोद सोनवणे यांची उमेदवारी शेवटपर्यंत टिकेल अशी चर्चा शेवटपर्यंत होती. मात्र उमेदवारी अर्ज माघारीच्या आजच्या दिवशी मात्र सोनवणे यांनी अचानक माघार घेतली आणि गव्हाणे एकमेव उमेदवार राहिल्याने त्यांच्या मागे आता नेमके कोण-कोण आहेत याचा बोध लवकरच होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com