अखेरच्या क्षणी दत्तात्रेय भरणे अन् जगदाळे बिनविरोध...

हर्षवर्धन पाटील यांना भाजपने अद्याप केंद्रातील सत्तेचे पद दिले नाही.
Dattatraya Bharane, Appasaheb Jagdale

Dattatraya Bharane, Appasaheb Jagdale

sarkarnama

वालचंदनगर : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (Pune District Bank Election) निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसेचे नेते राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे (Dattatraya Bharane) व जिल्हा बॅंकेचे विद्यमान संचालक आप्पासाहेब जगदाळे (Appasaheb Jagdale) बिनविरोध झाले आहेत. भरणे व जगदाळे यांच्या विरोधातील उमेदवारी अर्ज अंतीम क्षणाला माघारी घेतल्यामुळे यांची संचालकपदी बिनविरोध वर्णी लागली आहे.

<div class="paragraphs"><p>Dattatraya Bharane, Appasaheb Jagdale</p></div>
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीची सरशी

पुणे जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीला राज्यामध्ये महत्व आहे. २ जानेवारी रोजी जिल्हा बॅंकेची निवडणूक होणार आहे. आज बुधवार (ता.२२) रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतीम तारीख होती. जिल्हातून 'ब' वर्गासाठी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे व इंदापूर तालुक्यातून अ वर्गातून संचालक आप्पासाहेब जगदाळे यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले होते. भरणे यांच्या विरोधामध्ये 'ब' वर्गातून चार उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यातील तीन अर्ज यापूर्वीच मागे घेण्यात आले होते. जगदाळे व हर्षवर्धन पाटील यांच्या गटाच्या रावसाहेब कोकाटे यांनी 'ब' वर्गातून भरणे यांच्या विरोधामध्ये दाखल केलेला उमेदवारी अर्ज माघारी घेतला नव्हता. तसेच जगदाळे यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रसेच पक्षाच्या भाऊसाहेब सपकळ व सणसरच्या अॅड. रणजित निंबाळकर यांना उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

यातील सपकळ यांनी यापूर्वीच निवडणूक अर्ज माघारी घेतला. मात्र, निंबाळकर यांनी अर्ज माघारी घेतला नव्हता. 'ब' वर्गामध्ये भरणे व 'अ' वर्गात जगदाळे यांचे पारडे जड होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये जगदाळे यांनी भरणे यांची साथ सोडून माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना साथ दिल्यामुळे जिल्हा बॅंकेची निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जगदाळे यांच्या विरोधामध्ये काय भूमिका घेणार याकडे जिल्हाचे लक्ष लागले होते.

तसेच कोकाटे यांच्या अर्जामुळे 'ब' गटातील निवडणूक बिनविरोध होणार नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जगदाळे यांच्या विरोधातील निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज व भरणे यांच्या विरोधातील कोकाटे यांचे उमेदवारी अर्ज आज माघारी घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भरणे व जगदाळे यांची संचालक पदी बिनविरोध निवड झाली आहे.

<div class="paragraphs"><p>Dattatraya Bharane, Appasaheb Jagdale</p></div>
शिवसेना खासदाराच्या मातोश्रींनीही सोडली पक्षाची साथ

हर्षवर्धन पाटील यांना भाजपने अद्याप केंद्रातील सत्तेचे पद दिले नाही. पाटील यांच्या केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याशी वाढलेल्या घसटणीमुळे भविष्यात त्यांना सहकारात संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र हर्षवर्धन पाटील, आप्पासाहेब जगदाळे यांनी एकत्रित निरा भिमा सहकारी साखर कारखाना, कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना, पंचायत समिती उपसभापती पद निवडणूक बिनविरोध केली. त्यानंतर जिल्हा बँक निवडणुकीत देखील त्यांची जादू चालून जगदाळे हे बिनविरोध निवडून आले. त्यामुळे हर्षवर्धन पाटील व आप्पासाहेब जगदाळे यांनी सलग चार निवडणुका बिनविरोध करून विजयी चौकार मारला आहे. आप्पासाहेब जगदाळे यांच्या रूपाने "अ" वर्ग मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने आपले खाते उघडले आहे.

तालुक्यातील मतदारांनी सोडला सुटकेचा नि:श्‍वास...

इंदापूर तालुक्यामध्ये 'अ' वर्गामध्ये सुमारे १८३ नागरिकांचे मतदान आहे. आप्पासाहेब जगदाळे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे तालुक्यात निवडणूक होणार होती. जगदाळे यांचे पारडे जड असतानाही मतदारांना कुणाला मतदान करायचे असा पेच निर्माण झाला होता. मात्र निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे मतदारांनी सुटकेचा निश्‍वास: सोडला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com