Wabalewadi ZP School : बंदी झुगारुन अशोक पवार वाबळेवाडीत; नेमके काय झाले ?

MLA Ashok Pawar Vs Wabalewadi : महिलांच्या भितीने रात्रीचे गुपचुप वाडीत आल्याचा ग्रामस्थांचा आरोप
Ashok Pawar, Wablewadi School
Ashok Pawar, Wablewadi SchoolSarkarnama

Pune News : आपल्या शाळेची बदनामी करत असल्याचा आरोप करीत वाबळेवाडीच्या ग्रामस्थांनी आमदार अशोक पवारांना गावबंदी केली आहे. या ठरावाला दिवसही उलटत नाही तोच आमदार पवार वाबळेवाडीत आलेही आणि जेवूनही गेल्याची माहिती आहे. महिलांच्या भितीने रात्रीच्या वेळी येऊन गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थांच्या या भूमिकेने आमदार पवार आणि वाबळेवाडी ग्रामस्थांमधील वाद चिघळण्याच्या वाटेवर आहे. (Latest Political News)

वाबळेवाडी येथील ग्रामस्थांनी पालकसभा घेवून आमदार अशोक पवारांना गावबंदीचा ठराव मंजूर केला आहे. मात्र वाबळेवाडीतील एका दु:खद परिवाराला पवारांनी भेट दिली आहे. याबाबत आमदार पवारांनी काहीच प्रतिक्रिया दिली नसली तरी त्यांनी वाबळेवाडीत येवून दाखविले हाच संदेशच गावबंदी करणाऱ्या समस्त वाबळेवाडीकरांना दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Ashok Pawar, Wablewadi School
Sanjay Raut On Sharad Pawar : मोदींशेजारी बसण्याआधीच संजय राऊतांनी पवारांना 'असे' अडकवले...

विधानसभेत बुधवारी (ता.२६) वाबळेवाडी शाळाप्रकरण उपस्थित करीत आमदार पवारांनी शाळा प्रकरणाची चौकशी विशिष्ठ वेळेत पूर्ण करण्याची मागणी केली होती. सदर निवेदनात शाळेची चुकीची माहिती दिल्याचे सांगत वाबळेवाडीकरांनी विशेष पालकसभा ग्रामसभा घेत शुक्रवारी (ता. २८) आमदार अशोक पवारांना गावबंदी जाहीर केली.

या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात पसरले असतानाच पवार रविवारी (ता.३०) रात्री साडेसातच्या सुमारास वाडीत गेले होते. त्यांनी ज्येष्ठ लताबाई वाबळे यांचे निधन झाल्याने त्यांच्या परिवाराला सांत्वनपर भेट दिली. माजी सभापती विश्वास ढमढेरे, खरेदी विक्री संघाचे संचालक संभाजी भुजबळ, अमित राऊत यांच्यासमवेत होते. दरम्यान, सदर भेटीनंतर त्यांनी कुठलाही फोटोही देणे टाळल्याचीही चर्चा आहे. पर्यायाने वाबळेवाडीकरांनी गावबंदीचे आव्हान देवूनही पवारांनी आवर्जून वाबळेवाडीला भेट दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

Ashok Pawar, Wablewadi School
Parliament Expense : अबब ! संसदेतला मिनिटा-मिनिटाचा खर्च लाखांमध्ये; विरोधकांमुळे कोट्यवधी पाण्यात

महिलांच्या भितीनेच पवार रात्रीच्या वेळी आले

पवारांनी गावाला भेट दिल्यानंतर ग्रामस्थ सतीश वाबळे व सतीश कोठावळे म्हणाले, आमदार पवार रविवारी वाडीत आल्याचे महिलांना उशिरा समजले. महिलांनी इशारा दिल्यानेच ते घाबरलेले आहेत. त्यामुळेच ते अंधार पडल्यानंतर गुपचुप वाबळेवाडीत येवून गेले. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी सांगून वाडीत यावे", असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

शाळा प्रकरणातील तक्रारदार असलेला कंत्राटदार गाडीत घेवून त्यांनी वाडीप्रवेश केला त्याबाबत आणि माध्यमांसमोर पुन्हा गावावर हल्ला केला त्याबाबत लवकरच पत्रकार परिषद घेवून काही गंभीर गोष्टी बाहेर काढणार असल्याचा इशाराही ग्रामस्थांनी यावेळी दिला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com