
Pimpri-Chinchwad News : पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिकेच्या प्रशासकीय राजवटीतील कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार चिंचवडचे स्वर्गीय भाजप (BJP) आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांनी उघडकीस आणला होता. त्यांचा हा लढा त्यांच्या पत्नी चिंचवडच्या नवनिर्वाचित आमदार अश्विनी जगताप यांनीही पुढे सुरु ठेवला आहे.
पिंपरी पालिकेच्या १५१ कोटी रुपयांच्या जॅकवेल बांधणी निविदेत २० ते २५ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचे गतवर्षी सप्टेंबर महिन्यात लक्ष्मण जगतापांनी पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर त्यांनी पालिकेच्या वायसीएम रुग्णालयाच्या दीड कोटी रुपयांच्या हाय सक्शन मशिन खरेदीतील घोटाळा उघडकीस आणला. हा प्रश्न थेट विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात त्यांनी उपस्थित केला होता.
या खरेदीत जनतेच्या कराचे पाऊण कोटी रुपये नाहक खर्ची पडले होते. यामुळे जगतापांनी याबाबत तारांकिंत प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर हा मशिन पुरवठा ठेका रद्द केला झाला होता. दरम्यान, आ. लक्ष्मण जगतापांच्या निधनानंतर २६ फेब्रुवारीला झालेल्या चिंचवडच्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी अश्विनी निवडून आल्या.
त्यांनीही पतीच्या भ्रष्टाचाराचा लढा पुढे सुरु ठेवला. पिंपरी पालिकेच्या वायसीएम रुग्णालयाच्याच नवीन लाँड्री मशीन खरेदी निविदेतील घोटाळा त्यांनी समोर आणला. ही निविदा आर्थिक हितसंबंध जोपासणारी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मर्जीतील ठेकेदारांना पात्र करण्यासाठी तिच्या अटीशर्ती तयार करण्यात आल्याचे सांगत त्यामुळे आठ वर्षांत २१ कोटी ६९ लाख रुपयांच्या जनतेच्या पैशाची उधळपट्टी होणार असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
त्यामुळे याबाबत चौकशी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तसेच फेरनिविदा प्रसिद्ध करावी, अशी मागणी अश्विनी जगतापांनी पालिका आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह यांच्याकडे आज केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.